जाणून घ्या – दमा आजाराची लक्षणे कारणे व ९ घरगुती उपचार

दमा-आजाराची-लक्षणे-कारणे-व-घरगुती-उपाय
School photo created by freepik – www.freepik.com

दमा आजाराची लक्षणे कारणे व घरगुती उपाय – दमा हा सर्वांत त्रासदायक रोग आहे. श्वसननलिकेमध्ये अडथळा आल्याने श्वास घेता येत नाही, म्हणून दम लागतो.आणि छाती वाजायला लागते कधी कधी ब्रॉंकायटिस आणि दमा ओळखण्यात गोंधळ होतो. बऱ्याच मुलांमध्ये ब्रॉंकायटिसमध्ये छाती वाजते. परंतु मुले मोठी झाल्यावर हा रोग होत नाही.

 तान्ह्या बाळापासून म्हताऱ्या माणसापर्यंत कोणत्याही वयात दमा होऊ शकतो. दहा टक्के मुलांना आणि पाच टक्के प्रौढांना तो होतो. साधारणतः दहा वर्षांच्या आतील मुलांना आणि पाच टक्के प्रौढांना तो होतो. साधारणतः दहा वर्षाच्या आतील मुलांना याची बाधा होते. मुलगे आणि मुली यांच्यामध्ये हे प्रमाण साधारणतः २:१ असते.

दमा आजाराची लक्षणे – Symptoms of asthma

१. दमा आजाराची लक्षणे दमा झालेला मुलगा श्वास घेण्यासाठी अक्षरशः धडपडतो.
२. श्वास घेतानापेक्षा श्वास सोडताना जास्त त्रास होतो.
३. कारण लहान श्वसनलिकांत कफ साठवलेला असतो. म्हणून श्वास कष्टाने बाहेर पडतो.
४. सर्वच दमेकऱ्यांना दिवसापेक्षा रात्री जास्त त्रास होतो.
५. लहान मुलांना वारंवार ताप खोकला येऊन दम लागतो.
६. दमा नियमित अंतराने येतो.
७. दमेकरी मूल अतिशय कृश होते.
८. त्याला छाती फुगवता येत नाही. छातीचा आकारही बिघडलेला असतो.
९. श्वास सोडताना छातीमध्ये घरघर असा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो.
१०.मुलं परावलंबी आणि आत्मविश्वास हरवलेले असते.
११. सतत चिंताग्रस्त आणि भयग्रस्त असते.

दमा आजाराची कारणे – Causes of asthma

१.दमा आजाराची लक्षणे . दम्याची अनेक कारणे आहेत. हवामानातील बदल, धूळ, अन्नपदार्थ, औषधे,सुगंधी अत्तरे यांची ऍलर्जी हे महत्वाचे कारण आहे.
२. कापसाचे तंतू, गव्हाचे पीठ, फुलांचे परागकण, प्राण्यांचे केस, बुरशी, किडे, झुरळे याचीही काही मुलांना ऍलर्जी असते.
३. गहू अंडे, दूध, चॉकलेट,वाटणे , बटाटे , मांस, मासे यांची अलर्जी असते.
४. शरीरातल्या काही रासायनिक घटकांत आणि छातीच्या स्नायूंचे कार्य यात बिघाड झाल्यामुळे हि दमा होतो.
५. ऍलर्जीक पदार्थ मानसिक ताण हवेचे प्रदूषण जिवाणू आणि अनुवंशिकता हि सुद्धा दम्याची कारणे आहेत.
६. आई वडील दोघांनाही दमा असेल तर मुलांना दमा होण्याची ७५ ते १०० शक्यता असते.

दमा आजारावर घरगुती उपचार – Home remedies for asthma

१. दमा आजाराची लक्षणे शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीत चालू ठेवण्याकडे आणि शरीरातील दूषित घटक बाहेर घालवण्याकडे लक्ष दिले तर दमा आटोक्यात आणता येतो. Also read बालवयातील लठ्ठपणा – एक नवी आरोग्य समस्या

२.दमा आजाराची लक्षणे – पोटावर मातीचा लेप दिल्याने पचनकार्य सुधारते. कफ मोकळा होण्यासाठी आणि श्वसनकार्य सुधारण्यासाठी छातीवर मातीचा लेप दयावा.

३. गरम पाण्याची वाफ नाकात घ्यावी. सूर्यस्नान करावे. गरम पाण्यात पाय बुडवून ठेवावेत. त्यामुळे छातीमधील कफ मोकळा होतो.

४. मुलांच्या खोलीत कोणालाही धूम्रपान करू देऊ नये. तंबाखूच्या धुरामुळे दमा वाढतो. मुलाला मानसिक शांती लाभेल असे घरातील वातावरण असावे. मुलाला दम्याचा त्रास सुरु झाल्यावर पालकांनी घाबरुन न जाता शांत राहून त्याला धीर दयावा.

५. आहार अत्यंत महत्वाचा आहे. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे प्रमाण आहारात कमी असावे. कारण त्यामुळे शरीरात आम्लता निर्माण होते. अल्कली धर्माचे पदार्थ – उदा. फळे, पालेभाज्या, मोड आलेल्या उसळी असा आहार दयावा. तांदूळ, साखर,दही, तळलेले पदार्थ यांमुळे कफ जास्त तयार होतो. म्हणून ते देऊ नयेत. रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी दोन तास आधी घ्यावे.

६. मुलाला पोट भरुन खायला देऊ नये. थोडीशी भूक ठेवावी. प्रत्येक घास सावकाशपणे चावून खायला शिकवावे. दिवसभरात मुलाने सहा ते आठ पेले पाणी प्यायला हवे . मात्र जेवताना पाणी देऊ नये.

७.दम्यावर ,मध गुणकारी आहे. मधाचा नुसता वास घेतला तरी दमा कमी होतो असे म्हणतात. त्याचा परिणाम एक तासभर राहतो. दुधात किंवा पाण्यात मिसळून मध घेतला तरी आराम पडतो.

८. दम्यासाठी हळद उपयुक्त आहे. मधाचा नुसता वास घेतला तरी दमा कमी होतो असे म्हणतात. त्याचा परिणाम एक तासभर राहतो. दुधात किंवा पाण्यात मिसळून मध घेतला तरी आराम पडतो.

९. दम्यासाठी हळद उपयुक्त आहे. अर्धा चमचा हळद कपभर दुधात उकळून दिवसातून तीन वेळा द्यावी. लसूण हेही चांगले औषध आहे. १५ मि . लि दुधात लसणाची एक पाकळी टाकून ते उकळावे आणि दिवसातून मुलाने एकदा दयावे दम्याचा त्रास होत असताना मोहरीच्या तेलात कापूर मिसळून छाती व पाठ चोळावी. कफ मोकळा होतो.

प्रतिबंधात्मक उपाय :
ज्या पालकांना स्वतःला ऍलर्जीचा त्रास होतो त्यांनी आपल्या मुलांची या बाबतीत विशेष काळजी घ्यावी बाटलीने दूध पिणाऱ्या मुलांपेक्षा अंगावर पिणाऱ्या मुलांना ऍलर्जीचा त्रास कमी होतो. मासांहारी पदार्थ, डाळी, मका, दूध, यांची दहा महिन्यांच्या आतील मुलांना ऍलर्जी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून अन्न देऊ नयेत. धूळ हवेचे प्रदूषण, दमट हवामान यांपासून मुलांना दूर ठेवावे.

जाणून घ्या – दमा आजाराची लक्षणे कारणे व घरगुती उपायमाहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!
      

2 Comments

  1. Sandesh V Shinde December 3, 2020

Add Comment