Vitamin B1 Benefits in Marathi – Foods, Diseases

Health-Benefits-of-Vitamin-B1

आपल्या शरीरातील कार्बोहैड्रेट पासून ऊर्जा मुक्त करण्याचे काम बी जीवनसत्व करते . Vitamin B1 हे आपल्या शरीरातील आरएनए(RNA) व डीएनए(DNA) च्या उत्पादनात महत्वाची भूमिका बाजवतात. तसेच मज्जातंतू कार्यामध्ये देखील समाविष्ट असतात .

पचनक्रिया सुधारते व आपली त्वचा देखील चांगली राहते. या जीवनसत्वामुळे आपल्या शरीरातील स्नायू मजबूत राहतात. थायमिन आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन आणि प्रोटीन ह्यांचे संतुलन ठेवण्यास मदत करते. दरदिवशी Vitamin B1 ची मात्रा १ मिलिग्रॅम इतकी लागते. चला तर बघूया Vitamin B1 in Marathi

शास्त्रीय नाव : थायमिन
Scientific Name : Thiamine

Vitamin B1 Foods and Vegetables – फळे व भाज्या

कलेजी, गहू, संत्री, हिरवे वाटणे, अंडी, तांदूळ, हिरव्यापाले भाज्या, ड्रायफ्रूट, फॅटी फिश, मोड आलेले कडधान्य, साबुदाणा

Vitamin B1 Diseases – अभावी होणारे रोग व समस्या

बेरीबेरी रोग
बेरीबेरी रोगाचे दोन प्रकारचे आहेत. कोरडे व आद्र
आद्र बेरीबेरी रोग हा ज्यांना होतो त्यांची नस तीव्रगतीने धावू लागते व त्यांचे हृदय कमजोर होऊ लागते आणि कोरड्या बेरीबेरी रोगामुळे रुग्ण हे दरदिवशी कमजोर व असहाय होत जातात. व त्याच्या शरीरातला अशक्तपणा वाढतो.

Vitamin B1 अभावी गजकर्ण , खरूज, नायटा सारखे त्वचेचे रोग देखील होऊ शकतात. थायमिन च्या कमतरतेमुळे भूक कमी लागते व वजन कमी होते. अपचन गॅस सारख्या समस्या होतात. थायमिन मुळे शरीरातली शुगरची मात्रा नियंत्रित राहण्यास मदत होते.

थायमिन मुळे आपले मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. जर आपल्या शरीरात B1 Jivansatva ची मात्रा भरपूर प्रमाणात झाली तर ती लघवीवाटे शरीरातून बाहेर निघून जाते.

शरीराला दररोज लागणारी आवश्यकता आरोग्यानुसार:

वयानुसार वयोगटकमीत कमी दरदिवशी
लागणारा डोस
जन्मापासून ६ महिन्याच्या बाळांना०.२ मिलिग्रॅम
९ ते १३ वर्षापर्यंतच्या मुलांना०.९ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना १.२ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलींना १.० मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या पुरुषांना  १.२ मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या महिलांना १.२ मिलिग्रॅम
गरोदर स्रीयांना            १. ४ मिलिग्रॅम 
स्तनपान करणाऱ्या महिलांना १. ४ मिलिग्रॅम 

Related Post :
E Jivansatva
A Jivansatva

Vitamin B1 in Marathi माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा…!!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या ….घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या..!!

Add Comment