Vitamin B in Marathi – ब जीवनसत्व मराठीत

B-Vitamin-in-Marathi
Vitamin B Vectors by Vecteezy

Vitamin B चा शोध फुंक या शास्त्रज्ञाने १९१२ मध्ये लावला. तांदळाच्या दाढी वेगळ्या करून त्यावर शोध लावला व त्याला ब जीवनसत्व असे नाव देण्यात आले. त्यानंतर आणखी ८ जीवनसत्वांचा शोध अशाच प्रकारे लागला व त्यांना ब जीवनसत्वांचा समूह असे नाव देण्यात आले. ब जीवनसत्व पाण्यात सहज विरघळते व आपल्या शरीरातील चयापचय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतो . ह्या जीवनसत्वाची नावे सामान्यतः सारखीच आहे पण रासायनिकदृष्टीने ती भिन्न सयुंगे असतात.

Vitamin B मुळे आपली पचनक्रिया चांगली राहते. त्वचा निरोगी व केस मजबूत होतात. ब जीवनसत्व हे आपल्या नवीन आजारांपासून लढण्यास मदत करतात.इतर पोषकद्रव्याप्रमाणे मानवी शरीरात जीवनसत्वाचे विघटन केले न जाता ती जशीच्या तशी वापरली जातात. जीवनसत्व ए, ड , ई आणि के हे शरीरात मेदात साठवलेली असल्यानी ती रोज घेण्याची गरज नसते.

जीवनसत्व ब आणि के पाण्यात विरघळणारे घटक असल्यामुळे ते शरीरात साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे ह्या जीवनसत्वाचे सेवन रोजच्या आहारातून घेणे गरजेचे ठरते.जर ब आणि के जीवनसत्वाचे प्रमाण शरीरात जास्त झाले तर ते शरीरातून लघवीवाटे बाहेर निघून जातात.

Types of vitamin B – ब जीवनसत्व चे प्रकार

जीवनसत्व B1 – थायमिन
जीवनसत्व B2 –रायबोफ्लेवीन
जीवनसत्व B3 –नियासिन
जीवनसत्व B5 – पैंटोथैनिक ऍसिड
जीवनसत्व B6 – पायरॉडॉक्सिन
जीवनसत्व B7 – बायोटिन
जीवनसत्व B9 – फॉलिक ऍसिड
जीवनसत्व B12 – सायनोकोबाल्मिन

Vitamin B in Marathiमाहिती आवडल्यास नक्की Share Comments करा…!!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या ….घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या..!!

Add Comment