बद्धकोष्ठ वर घरगुती उपाय कोणते आणि त्याची लक्षणे व कारणे कोणती आहेत जाणून घ्या.

Food photo created by jcomp – www.freepik.com

बद्धकोष्ठता म्हणजे काय ?- What is Constipation

बद्धकोष्ठ वर घरगुती उपाय कोणते आणि त्याची लक्षणे व कारणे कोणती – बद्धकोष्ठ म्हणजे शौचाला न होणे. किंवा साफ न होणे. शौचाला जोर द्यावा लागतो गाठी पडतात. लहान मुलांमध्ये हा त्रास सर्वसामान्यपणे बराच असतो आणि तो आईच्या काळजीचा विषय बनतो. बद्धकोष्ठ हे अनेक रोगांचे मूळ कारण आहे. बद्धकोष्ठतेमुळे काही विषारी घटक रक्तामध्ये मिसळतात. आणि शरीराच्या सर्व भागातून पसरतात. त्यामुळे महत्वाचे अवयव नीट काम करत नाही. म्हणून प्रतिकारशक्ती कमी होते.

शौचाला किती वेळा व्हावे. याचे प्रमाण प्रत्येक मुलामध्ये वेगळे असते. बहुतेक मुलांना दिवसातून एकदा किंवा दोनदा होते तर काही मुलांना एक दिवसाआड होते चांगल्या आरोग्यासाठी मुलाला दिवसातून एकदा तरी पूर्णपणे शौच व्हायाला हवे. 

साखर आणि साखरेचे पदार्थ शक्यतो टाळावेच. साखरेमुळे ब जीवनसत्वाचा नाश होतो. पचनाचे कार्य ब जीवनसत्व वर अवलंबून असते. मैदा, केक, पेस्ट्री, बिस्कीट, चीज, मांसाहारी पदार्थ, टिकवलेले पदार्थ, पीठी साखर, आणि उकडलेली अंडी यांमुळे बद्धकोष्ठ होतो.

बद्धकोष्ठता लक्षणे – Symptoms of constipation

१. अनियमितपणे आणि अवेळी शौचाला होते.
२. मळाच्या गाठी झाल्यामुळे त्रास होतो.
३. इतर लक्षणे म्हणजे जिभेवर थर साचतो.
४. तोंडाला वास येतो.
५. भूक लागत नाही.
६. पोट कायम फुगल्यासारखे वाटते.
७. कधी जुलाब तर कधी बद्धकोष्ठ

बद्धकोष्ठता कारणे – Causes of constipation

१. अयोग्य आहार आणि अनियमितपणे खाण्याची सवय हि बद्धकोष्ठची दोन कारणे आहेत.
२. प्रत्येक अन्नपदार्थात त्याचा नैसर्किग अवस्थेत चोथ्याचे प्रमाण असते.
३. चोथ्यामुळे आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते. व खाल्लेले अन्न पुढे पुढे सरकत जाते. सध्याच्या काळात लहान मुले जे खातात. त्यामध्ये चोथ्याचे प्रमाण जवळ जवळ असते. त्यामुळे बद्धकोष्ठचा त्रास होतो.
४. जीवनसत्व आणि क्षार कमी असलेले निकस अन्न पाणी कमी पिणे अन्न चावून न खाणे चुकीचे अन्नपदार्थ एकत्र खाणे अवेळी खाणे पिणे या सर्वांमुळे अन्नाचे पचन नीट होत नाही.
५. शौचाला लागलेले असताना न जाण्याची वाईट सवय व वारंवार जुलाबाची औषधे घेणे हिसुद्धा बद्धकोष्ठाची कारणे आहेत.

बद्धकोष्ठ वर घरगुती उपाय – Home Remedies for Constipation

१. बद्धकोष्ठाचा उपचार मुलांचे वय बघून करावा लागतो. तान्हे बाळ अंगावर पीत असेल तर आईच्या दूध पाजण्याचा चुकीच्या पद्धतीमुळेही बाळाला बद्धकोष्ठ होतो. म्हणून आईने अंगावर पाजण्याची पद्धत सुधारायला हवी जुलाब सुरु झाल्यावर म्हणूनआधी बाळाला पाणी किंवा संत्र्याच्या सर दयावा कोमट पाण्याचा एनिमा दयावा किंवा ग्लिसरीन ची कांडी ठेवावी. जुलाबाचे औषध देऊ नये. मूल जर बाटलीने पीत असेल तर त्यामध्ये काही चूक असेल तर ती सुधारावी. Also read 8 Healthy Benefits of orange in marathi

बद्धकोष्ठ-वर-घरगुती-उपाय-लक्षणे-कारणे

२. मुलाचे वय दोन वर्षे किंवा जास्त असेल तर पहिले दोन तीन दिवस त्याला नुसती फळे दयावी. नंतर त्याच्या वयोमानानुसार योग्य आहार सुरु करावा. जुलाबाचे औषध कोणत्याही परिस्थितीत देऊ नये. कोमट पाण्याचा एनिमा दयावा. मोठ्या मुलांना नंतर व्यायाम करण्यास शिकवावे. बद्धकोष्ठ वर घरगुती उपाय म्हणून थोडेसे बदामाचे तेल आणी सॅलेड चे जेवण असा आहार दयावा.

बद्धकोष्ठ-वर-7-घरगुती-उपाय-लक्षणे-व-कारणे
Photo by Chan Walrus from Pexels

३. बद्धकोष्ठ वर घरगुती उपाय दिवसभरातुन पाणी भरपूर प्यायल्याने बद्धकोष्ठाचा त्रास तर दूर होतोच. पण आतडीही स्वच्छ होतात. अन्नातले घातक पदार्थ पाण्यात मिसळून सौम्य होतात. आणि शरीराबाहेर टाकले जातात. परंतु जेवताना पाणी पिऊ नये. कारण त्यामुळे जेवताना पाचक रस पातळ होतात. जेवणापूर्वी अर्धा तास किंवा जेवणांनंतर एक तासाने पाणी प्यावे.

बद्धकोष्ठ-वर-घरगुती-उपाय
Background vector created by luis_molinero – www.freepik.com

४. साधा आणि नैसर्गिक आहार हाच बद्धकोष्ठ वर घरगुती उपाय आहे. धान्य धान्याचे भरड, मध काकवी, पालेभाज्या, फ्रेंच बीन्स टोमॅटो लेट्युस कांदा, कोबी, लाल भोपळा, बीट, गाजर, अशा प्रकारच्या भाज्या आणि पीअर, द्राक्षे, अंजीर, पपया, आंबा, बोरे, पेरु, संत्रे अशी ताजी फळे सुके अंजीर मनुका खजूर, तऱ्हेचा सुका मेवा, लोणी तूप, असे पदार्थ आहारात असावे.

बद्धकोष्ठ वर 7 घरगुती उपाय लक्षणे व कारणे

५. केळी आणि फणस सोडून सगळी फळे बद्धकोष्ठ दूर करतात. परंतु काही फळे जास्त प्रभावी असतात. त्यामध्ये बेलफळ सर्वांत उत्तम आहे. त्याने पोट साफ होते. आणि आतडी बळकट होतात. दोन तीन महिने रोज घेतले तर पोटातील संपूर्ण मळ साफ होतो. बेलफळ नेहमी जेवणाआधी घ्यावे. मुलांना ३० ग्राम बेलफळ पुरेसे आहे. पीअर हे पण एक चांगले फळ आहे. ते न्याहरीनंतर किंवा जेवणांनंतर घ्यावे.

६. बद्धकोष्ठ वर घरगुती उपाय म्हणून बद्धकोष्ठासाठी द्राक्षे चांगले आहे. त्यातील नैसर्गिक साखर आणि आंबटपणा यांमुळे पोट चांगले साफ होते. शिवाय पचनाचे कार्य सुधारते. मुलांना कमीत कमी १५० ग्राम द्राक्षे मिळत नसतील तर मनुका दयावा. लिंबाचे सरबत हा सुद्धा बद्धकोष्ठावरचा चांगला उपाय आहे.

बद्धकोष्ठ-वर-घरगुती-उपाय
Background photo created by mrsiraphol – www.freepik.com

७. बद्धकोष्ठबरोबर पोट दुखत असेल तर बद्धकोष्ठ वर घरगुती उपाय म्हणून गरम पाण्याच्या पिशवीने किंवा टॉवेलने ते शेकून काढावे. टबमध्ये थंड पाणी भरून त्यात मुलाला बसवून ठेवावे. बद्धकोष्ठ दूर करण्याचा हा पण एक उपाय आहे. बद्धकोष्ठ टाळण्यासाठी मुलांनी भरपूर खेळणे आवश्यक आहे. पोहणे, धावणे यांसारखे व्यायाम केल्याने पोटाचे स्नायू बळकट होतात. आणि बद्धकोष्ठ होत नाही.

बद्धकोष्ठ वर घरगुती उपाय कोणते आणि त्याची लक्षणे व कारणे कोणती आहेत जाणून घ्या. – माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

Add Comment