Healthy 6 Benefits of Kiwi fruit for pregnant women – गर्भवती महिलांसाठी किवी फळाचे फायदे

Benefits-of-Kiwi-fruit-for-pregnant-women-in-marathi

Kiwi Fruit दिसायला एक लहान फळ आहे .ते चिकू ह्या  फळासारखे  दिसते. किवी हे फळ चवीला खूप रुचकर आहे. म्हणजे त्याची चव गोड़ आणि थोडीशी तिखट आहे. तसेच शरीरासाठी खूप पौष्टिक फळ आहे.  किवी हे फळ आतून हिरव्या रंगाचे दिसते तसेच त्यात लहान लहान काळ्या रंगाच्या बिया असतात ज्या शरीरासाठी लाभदायी आहे .

किवी ह्या फळाची शेती न्यूझीलंड आणि चीन मध्ये केली जाते . किवी ह्या फळाचा उगम चीन ह्या देशात झाला. २० व्या शतकाच्या सुरवातीस हे फळ न्यूझीलँड मध्ये आणले तेथे त्याला खूप लोकप्रियता मिळाली.

न्यूझीलँड चा राष्ट्रीय पक्षी  Kiwi आणि ह्या चिनी फळात साम्य असल्याने ह्या फळाचे नाव किवी असे  ठेवण्यात आले. त्यामुळेच  पुढे हे फळ किवी ह्या नांवाने ओळखले जाऊ लागले. चला तर बघूया Healthy 6 Benefits of Kiwi fruit for pregnant women

शास्त्रीय नाव :अप्टेरिक्स (Apteryx)
इंग्रजी नाव: किवी (kiwi)


Kiwi Fruit for Pregnant women – गर्भवती महिलांसाठी

  1. गरोदर स्त्रियांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे. Kiwi fruit फळात आवश्यक व्हिटॅमिन्स व पोषकतत्वे आहेत. गर्भवती महिलांसाठी पोषक आहार पुरवतात त्यामुळेच गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.

2. फक्त गर्भवती महिलांसाठीच हे फळ फायदेशीर आहे अस नाही ज्या महिला गर्भधारणेच्या प्रतीक्षेत आहेत त्या महिलांसाठी देखील Kiwi Fruit खूप लाभदायी आहे.

3. Kiwi Fruit ह्या फळात व्हिटॅमिन सी नैसर्गिक रित्या मुबलक प्रमाणात असल्यामुळे नवीन जन्माला आलेल्या बाळाला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात व त्यांचा मेंदूचा कार्याचा विकास होण्यास मदत करतात.

5. गरोदरपणात महिंलाचे हार्मोन्स बदलत राहतात त्यात चढ उतार होत राहते त्यालाच आपण इंग्रजी मध्ये मूड स्विंग असे म्हणतो जसे कि मन चलबिचल होणे, कधी निराशा वाटू लागणे कधी अचानक आनंदी वाटू लागणे असे अनेक बदल शरीरात होऊ लागतात तर ह्या सर्व गोष्टींवर हे फळ लाभदायी आहे. त्यामुळे Kiwi fruit चे नियंत्रितपणे योग्यरितीने सेवन केल्याने गरोदर पणात मानसिक संतुलन चांगले राहण्यास मदत करते.

6. किवी ह्या फळात साखरेचे प्रमाण नैसर्गिकरित्या उपलब्ध असल्यामुळे गरोदरपणात गर्भाला ईजा न पोहचता गोड पदार्थांची लागणारी गरज पूर्ण होते.व तसेच रक्तातील साखरेची पातळी वर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.


Benefits of Kiwi Fruit – किवी फळाचे फायदे

  1. रोगप्रतिकारक शक्ती(Immunity Booster)

Kiwi Fruit आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात . ह्या फळात अँटिऑक्सिडेन्ट आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपल्याला नवीन रोगासोबत लढण्याची ताकत मिळते. सर्दी व फ्लू सारखे आजार होण्याची शक्यता कमी करतात तसेच ६५ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रौढांना आणि लहान मुलांना किवी हे फळ खूप फायदेशीर आहेत.

2. पचनक्रिया(Improve Digestive system)

जर आपल्याला गॅस व ऍसिडिटी ची तक्रार असेल तर त्यावर Kiwi Fruit खाणे खूप फायदेशीर आहे. ह्या फळात फायबर व व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपल्याला अन्न पचन्यास मदत होते व आपली पचनक्रिया सुधारते.

3. रक्ताची पातळी वाढते(Hemoglobin)

किवी हे फळ खाल्याने आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. तसेच रक्तात लागणाऱ्या आयरन ची क्षमता हि परिपूर्ण करते. त्यामुळे ऍनिमिया सारख्या रोगावर नियंत्रण ठेवण्यास  मदत होते.

4. कोलेस्ट्रॉल(cholesterol)

 हृदयासंबधीत असणाऱ्या आजारासाठी हे फळ फायदेशीर आहे. Kiwi fruit रोज एक खाल्याने आपल्या हृदयातील रक्तप्रवाह सुरळीत चालू राहतो आणि तसेच आपले ब्लडप्रेशर नियंत्रीत ठेवण्यास मदत होते.

5. झोप (Beneficial for sleeping)

जर आपल्याला रात्री झोप न येणे किंवा झोपेसंबंधित तक्रारी असतील तर त्यासाठी रोज रात्री झोपायच्या १ तास अगोदर किवी फळाचे सेवन करणे फादेशीर आहे. त्यामुळे काय होत आपला थकवा दूर होतो व आपल्याला चांगली झोप लागते.

6. दमा( Healthy for asthma pations) 

किवी ह्या फळात असणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि अँटॉक्सिडेंट तत्त्वांमुळे दमा सारख्या असणाऱ्या आजारांवर नियंत्रण राहते. तसेच ह्या फळावर केलेल्या रिसर्च नुसार सांगण्यात येत कि जी माणसं इतर फळांसह किवी हे फळ नियमित सेवन करतात त्यांच्या फुफुसांच्या कार्यावर फायदेशीर परिणाम होतो .

7. वजन कमी करण्यासाठी (weight loss)

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तर हे फळ अवश्य खा. हे फळ आपल्या शरीरातील एक्सट्रा चरबी (फॅट्स) कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हे फळ आपले वजन नियंत्रित करण्यास मदत करते .

8. त्वचेसाठी लाभदायी (Healthy Skin)

किवी फळात व्हिटॅमिन्स सी व ई हे मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपल्या त्वचेसाठी  हे फळ फायदेशीर आहे. ह्या फळाचा ज्युस बनऊन पिल्यास आपल्या त्वचेला भरपूर प्रमाणात पोषण मिळते.


Essential ingredients in Kiwi Fruit – किवी फळात असणारे आवश्यक घटक

पोषकतत्वे(Nutritative)जीवनसत्व(Vitamins)खनिजे(Minerals)
फायबर : ३.० ग्रॅमव्हिटॅमिन के : ६%मॅंग्नेशियम : ५%
शुगर : ८. ९९ ग्रॅमव्हिटॅमिन सी :१२४ %पोटॅशियम :९%
कार्बोहैड्रेट : १४.६६ ग्रॅमव्हिटॅमिन ई : १०%कॉपर : १४%
फॅट : ०.५२ ग्रॅमफोलेट : ६%मॅगनीज : ५%
प्रोटीन : १.१४ ग्रॅम
कॅलरीज : ६१.० ग्रॅम

Kiwi Fruit Side Effects – किवी फळ खाणे जसे फायदेशीर तसेच धोकादाय:

१. Kiwi Fruit आपल्या शरीरासाठी जसे फायदेशीर आहे तसेच ते धोदायक हि आहे. 

२. किवी ह्या फळाचे जास्त सेवन केल्याने आपल्या पोटांचे विकार होऊ शकतात जसे कि पोट दुखणे,उलटी होणे किंवा पोटाला सूज येणे या प्रकारच्या समस्या  होऊ शकतात. 

३. त्यासाठी Kiwi fruit ह्या फळाचे सेवन करणे चांगले आहे पण नियंत्रित व कमी प्रमाणात व योग्य रीतीने करणे गरजेचे आहे. 

Related :
6 Healthy Benefits of Mango in Marathi – आंबा फळाचे फायदे मराठीत जाणून घ्या
Pomegranate 6 Healthy Benefits in Marathi – डाळींब फळाचे फायदे आणि घरगुती उपाय

Healthy 6 Benefits of Kiwi fruit for pregnant women – मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा….!!!

आपल्या आरोग्याची काळजी घ्या …. घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

6 Comments

  1. Manjiri August 7, 2020
  2. Swity August 7, 2020
  3. V.V.Tejankar March 26, 2021

Add Comment