कांजण्या रोग माहिती मराठीत – Chicken pox Disease in Marathi

Chicken-pox-disease-in-marathi

कांजण्या रोग इंग्रजी मध्ये चिकन पॉक्स (Chicken pox) असे म्हणतात. हा एक संसर्गजन्य रोग आहे. सामन्यतः हा आजार लहान मुलांना जसे कि ५ ते ९ वर्षाच्या मुलांना होतो. १ ते ४ आणि १० ते १४ वर्षांच्या मुलांमध्ये ह्याचे प्रमाण सामान्यतः कमी दिसते. चला तर बघुयात कांजण्या रोग माहिती मराठीत

कांजण्या लहान सहा महिन्यांच्या बाळाला सुध्दा ह्या आजाराचा संसर्ग होतो परंतु लहान बाळांमध्ये कांजण्या रोगा सोबत लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. कारण त्यांना ती आईच्या पोटात गर्भातच मिळालेली असते. त्यामुळेच मुलं जस जशी मोठी होऊ लागतात तशी त्यांची रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होऊ लागते. व कांजण्या हा आजार होण्याची शक्यता वाढते.

कांजण्या रोगाची लक्षणे – Chickenpox Symptoms

१.कांजण्या रोग सुरवातीला बारीक ताप येऊ लागतो.
२.त्यांनतर डोकं दुखू लागते.
३.भूक कमी लागते.
४.शरीरात अशक्तपणा जाणवु लागतो.
५.पुरळासारखे लाल बारीक ठिपके आपल्या शरीरावर दिसू लागतात.

कांजण्या रोग सर्वात प्रथम ते छातीवर वरच्या भागावर दिसू लागतात. त्यानंतर हळू हळू ते आपल्या चेहऱ्यावर, हातांवर व पायांवर दिसू लागतात. पुरळाच्या पुटकुळ्या हळू हळू मोठ्या होऊ लागतात. त्यांनतर त्यात पू तयार होऊ लागतो. त्यानंतर मग शेवटी त्या फोड्या कोरड्या होऊ लागतात व त्याच्या खपल्या पडतात.

कांजण्या शरीरावर एकाच वेळेस पुरळ येत नाही ती काही ठिकाणी येते तर काही ठिकाणी त्याच्या खपल्या पडणे चालू असते. प्रत्येकी लहान मुलांमध्ये ह्याचे प्रमाण हे कमी जास्त असते. काही मुलांच्या कानात, नाकात तर काहींच्या ते तोंडात दिसतील. काही मुलांच्या तर ते फक्त छाती वरच दिसतात. तर काही मुलांच्या ते पूर्ण शरीरावर दिसतात. कमीत कमी हा जो आजारपणाचा काळ आहे. तो १४ ते १७ दिवसांचा असतो किंवा जास्तीत जास्त १० ते २१ दिवसांचा असतो.

कांजण्या रोगाची कारणे – Chicken pox Reasons

कांजण्या-रोगाची-माहिती-मराठीत
Chicken Pox Vectors by Vecteezy

१.कांजण्या रोग हा आजार विषाणूंमुळे होतो.
२.हवेतील धूर व धुरामुळे देखील हा आजार पसरू शकतो.
३.अयोग्य आहारमुळे देखील हा आजार पसरतो.
४.शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे हा आजार पसरतो.
५.कांजण्या हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्याची शक्यता जास्त आहे.
६.लहान मुलांमध्ये कांजण्या रोग आजाराची लक्षणे साधारण स्वरूपाची असतात.
७.वयस्कर माणसांमध्ये ह्या आजाराची लक्षणे जास्त गंभीर स्वरूपाची असू शकतात.

कांजण्या घरगुती उपाय – Chickenpox Home Remedies

१.लहान मुलांना एकदम मोकळ्या खुल्या हवेशीर खोलीत ठेवावे. कारण कांजण्या झाल्यावर त्या फोड्यांवर खाज सुटत असते.
२.जर नखांनी खाजवले तर त्यावर जंतूंचा संसर्ग हा दुसऱ्याला होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लहान मुलांची नखे हि शक्यतो कापून दयावी जेणेकरून हा जंतुसंसर्गजन्य आजार पसरणार नाही.
३.सकाळ संध्याकाळ पोटावर आणि छातीवर मातीचा लेप लावावा.
४.सकाळ संध्याकाळी कडूनिंबाची पाने पाण्यात उकळवून सकाळ संध्याकाळी त्या पाण्याने अंघोळ घालावी.
५.खाण्यासाठी फळांचा रस आणि भाज्यांचा रस दयावा.
६.थोडे बरे वाटू लागल्यावर मग हळू हळू पूरक आणि पौष्टीक आहार चालू करावा.
७.E Jivansatva असलेले तेल अंगाला लावावे. कांजण्यांना लवकर खपल्या पडणे चालू होते.
८.तुळशीचा किंवा दालचिनीचा काढा करून तो दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात दिल्याने थोडे शांत वाटेल.
९. जेवणात कोथिंबीर आणि गाजर यांचे सूप करुन दयावे.

कांजण्या (Chicken pox disease in marathi) ह्यात आपण कांजण्या रोग लहान मुलाना कसा होतो त्याची लक्षणे काय त्याची मुख्य कारणे कोणती आहेत आणि ह्या रोगावर आपण घरगुती उपाय कसे करावे ते सांगितले आहे.

तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा….!!!

आपल्या आरोग्याची काळजी घ्या …. घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

Add Comment