औषधी फळ चिकू खाण्याचे फायदे 9 मराठीत

औषधी-फळ-चिकू-खाण्याचे-फायदे

चिकू एक तपकिरी रंगाचं फळ आहे. त्याची त्वचा उग्र स्वरूपाची आहे. फळ चवीला गोड आहे. चिकू हे फळ आतून दिसायला सुद्धा तपकिरी रंगाचे दिसते त्याच्या आत तपकिरी रंगाचा जाडसर लगदा आहे. चिकू ह्या फळात काळ्या रंगाच्या बिया असतात. त्या बियांपासून निघणारे तेल हे आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते. चला तर बघूया औषधी फळ चिकू खाण्याचे फायदे 9 मराठीत

फळ आपल्याला कोणत्याही त्रुतु मध्ये सहज उपलब्ध होते. चिकू फळात पाण्याची मात्रा तसेच प्रोटीन ,कार्बोहाड्रेट, फॅट्स, व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन सी नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात आढळतात.

लोह, फॉस्फरस काही प्रमाणात क्षार देखील आढळतात. व्हिटॅमिन ई ची मात्रा असल्यामुळे ते आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप लाभदायी आहे .चिकू हे फळ पिकलेले खाणे केव्हाही शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते परंतु चिकू हे फळ कच्चे  खाणे टाळावे कच्या चिकू चे सेवन केल्याने पोटात गॅस तयार होतो व पोट दुखू लागते. 

शास्रीय नाव : मनिलकर झापोटा (Manilkara zapota)
इंग्रजी नाव : स्पॉडिला (Sapodilla)

चिकू खाण्याचे फायदे – Chikoo Eating Benefits

1.कॅन्सर(Cancer):

चिकू फळात फायबर आणि अँटिऑक्सिडेन्ट भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपला कॅन्सर सारख्या रोगापासून बचाव होतो . ह्यात व्हिटॅमिन बी व व्हिटॅमिन ए देखील भरपुर प्रमाणात आहे. ह्यात व्हिटॅमिन ए असल्यामुळे आपल्याला तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

2.मानसिक आरोग्य(Mental health): 

चिकू खाण्याचे फायदे चिकू फळाचे सेवन केल्याने आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. ह्या फळाच्या सेवनाने शरीरातील थकवा व मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते.ज्यांना झोपेचा त्रास आहे किंवा कोणत्यातरी चिंतेनेग्रस्त असलेल्या पीडित लोकांना चिकू फळाच्या सेवनाने आराम मिळतो.

3.केसांसाठी(Healthy hair):

केसातील कोंडा घालवण्यासाठी चिकूंच्या बियांची पेस्ट बनवा त्यात एरंडी तेल मिक्स करा हे मिश्रण केसांच्या त्वचेवर लावा आणि केस दुसऱ्यादिवशी सध्या पाण्याने धुवून काढा त्यामुळे आपल्या केसांतील कोंडा निघून जाईल. आणि तसेच चिकू खाण्याचे फायदे मुळे केस चमकदार होतील.

4.डोळ्यांसाठी(Healthy Eyes):

चिकू फळ आपल्या डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांची बघण्याची शक्ती वाढते.तसेच वयस्कर लोकांना होणारे आजार मोतियाबिंदू व रातांधळेपणा सारख्या होणाऱ्या समस्या कमी होतात.

चिकू फळाचे औषधी फायदे मराठीत

5.गरोदर महिलांसाठी(Pregnanat women):

चिकू खाण्याचे फायदे गरोदर महिलांसाठी देखील खूप आहेत. कॅल्शियम ,आयरन, फॉस्फरस ची मात्रा भरपूर प्रमाणात असते . गर्भावस्थेत लागणारे कार्बोहैड्रेट ह्या फळात असल्यामुळे व तसेच गरोदरपणात  उलट्या होणे, चक्कर येणे, मन चलबिल होणे या सारख्या समस्यांवर आराम  मिळतो. त्यामुळे  चिकू या फळाचे सेवन करणे गरोदर महिलांसाठी फायदेशीर आहे.

6.रोग प्रतिकारकशक्ती वाढवते(Immunity Booster):

 ह्यामध्ये अँटिऑक्सिडेन्ट,व्हिटॅमिन सी, अँटिव्हयरल आणि अँटीबॅकटेरियल गुण असल्यामुळे आपल्या शरीरात पसरणारे  व्हायरस आणि  विषाणूंना नष्ट करतात . ह्यात असणारे पोटॅशियम, आयरन आणि फोलेट आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. चिकू मध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

7.हाडांसाठी फायदेशीर(Healthy Bones):

चिकूमध्ये कॅल्शियम , आयरन आणि फॉसफरस भरपूर प्रमाणात आहेत जे आपल्या हाडांसाठी खूप आवश्यक आहे. ह्यात असणाऱ्या कॅल्शियम,फॉसफरस आणि आयरन मुळे आपल्या हाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते. व आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे चिकू ह्या फळाचे सेवन करणे आपल्याला खूप लाभदायी आहे. 

8.ऊर्जा मिळते(Energy Booster): 

जे लोक रोज व्यायाम करतात त्याने ऊर्जेची खूप आवश्यकता असते त्यामुळे अश्या लोकांनी रोज एक चिकू खाणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल कारण चिकूमध्ये ग्लुकोज मात्रा असल्यामुळे ते आपल्या शरीराला लवकर ऊर्जा मिळवून देतात.

9.त्वचेसाठी फायदेशीर (Healthy For Skin):

चिकू खाण्याचे फायदे आपल्या त्वचेसाठी देखील भरपूर आहेत. कारण चिकू ह्या फळात A Jivansatva सोबत Vitamin B आणि Vitamin E मुबलक प्रमाणात असतात. चिकू मध्ये Vitamin E तत्व असल्यामुळे त्वचा चांगली व चमकदर राहते.

चिकू फळाचे आरोग्यदायी घटक – Healthy ingredients of Chikoo fruit

खनिजे(Minerals)जीवनसत्व(Vitamins)
सोडियम : ०%व्हिटॅमिन ए : १%
पोटँशियम : ५%व्हिटॅमिन सी : २४%
मॅंग्नेशियम : ३ %व्हिटॅमिन बी ६ : ०%
कोबालमिन : ०%
आयरन : ४%

चिकू आणि किवी फळ फरक – Chikoo and Kiwi Fruit Difference

किवी आणि चिकू हे दोन्ही फळ साधरणतः दिसायला एक सारखे आहे. ह्या दोन्ही फळांची बाहेरची त्वचा सारखी दिसते.

किवी हे आतून हिरव्या रंगाचे  दिसते आणि त्याच्या आत लहान बारीक बारीक बिया असतात ज्या आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे.

चिकू आतून तपकिरी रंगाचे दिसते आणि ह्यात देखील काळ्या रंगाच्या आकाराने थोड्या मोठया  बिया असतात. ह्या फळाच्या बियांपासून  बनणारे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते .

औषधी फळ चिकू खाण्याचे फायदे 9 मराठीत– माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा…!!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या ….घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या..!!

 

2 Comments

  1. Sumit Tembhare August 9, 2020

Add Comment