बालवयातील लठ्ठपणा – एक नवी आरोग्य समस्या

बालवयातील-लठ्ठपणा-एक-नवी-आरोग्य-समस्या
Isolated Vectors by Vecteezy

बालवयातील लठ्ठपणा – एक नवी आरोग्य समस्या शरीरात वाजवी पेक्षा जास्त मेद साठला तर त्याला लठ्ठपणा म्हणतात. शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा येतो. शरीरात मेद जास्त झाला तर हृदय, किडनी, यकृत या अवयवांना जास्त काम करावे लागते. माकडहाड, गुडघे, घोटे, या सांध्यांवर जास्त ताण पडतो. या सर्वांचा परिणाम म्हणजे आयुष्य कमी होते.

लठ्ठपणाची सुरवात लहानपणापासूनच होते. असे आढळून आले. म्हणून लठ्ठपणा टाळायचा असेल तर लहानपणीच काळजी घयायला हवी. वयाच्या पहिल्या वर्षातच लठ्ठ असलेल्या मुलांचे प्रमाण २५ टक्के असते. पाच वर्षांपर्यंत नऊ टक्के असते. पाच वर्षाची लठ्ठ असलेली मुले मोठेपणी सुद्धा लठ्ठच असतात.

क्रॉफर्ड आणि त्यांचे सहकारी या शास्त्रज्ञान्याच्या मते मूल जन्मल्यापासून सहा महिन्यांपर्यंत त्यांचे वजन ५.३४ किलो किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते लठ्ठपणाचे लक्षण आहे. किंवा उंची आणि वजन यांच्या प्रमाणापेक्षा २० टक्क्यांनी जास्त असेल तर ते लठ्ठपणाचे लक्षण आहे असे समजावे.

बालवयातील लठ्ठपणा वाढण्याची लक्षणे – Symptoms of childhood obesity

१. लहानपणी लठ्ठपणाचे तोटे त्या मानाने फारसे नसतात.
२. परंतु त्यांना वारंवार सर्दी- पडसे- खोकल्याच्या त्रास होतो.
३. दोन वर्षाच्या लठ्ठ मुलांना नीट चालता येत नाही.गुडघे एकमेकांना लागतात.
४. मोठ्या मुलांमध्ये काही मानसिक विकृती पण आढळतात.

बालवयातील लठ्ठपणा वाढण्याची कारणे – Causes of childhood obesity

१.बालवयातील लठ्ठपणाची अनेक कारणे आहेत.
२.अनुवंशिकता, जातीच्या, कुटुंबाच्या खाण्याच्या काही प्रथा, व्यायामाच्या अभाव आणि काही मानसिक कारणे हि मुख्य आहेत.
३.अडिपोज नावाच्या पेशीमध्ये किंवा ऊर्जेचे रूपांतर करणाऱ्या यंत्रणेमध्ये दोष असतील तर लठ्ठपणा येतो.

बालवयातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय – Home Remedies For Childhood Obesity

१. अकाली येणार लठ्ठपणा टाळण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार देणे महत्वाचे आहे. मेद कमी करण्यासाठी योग्य व्यायामही आवश्यक आहे. लठ्ठपणा दिसून आल्यावर सुरवातीला पहिले काही दिवस मुलाला पातळ पदार्थ द्यावे. 

२.लिंबू, संत्रे, अननस,यांचा रस दयावा. नंतर याच फळांचा काही दिवस आहारच दयावा. नंतर हळूहळू, कमी, कॅलरी असलेले अन्न सुरू करावे. आहारमध्ये कच्च्या कोशिंबीरमध्ये, हलक्या शिजवलेल्या भाज्या आणि फळे असावी. Also read 8 आरोग्यदायी अननस फळाचे फायदे मराठीत जाणून घ्या

बालवयातील-लठ्ठपणा-एक-नवी-आरोग्य-समस्या-घरगुती-उपाय
Photo by Karolina Grabowska from Pexels

३. वाजवीपेक्षा जास्त खाण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा येतो. म्हणून वजन पाहून मुलांच्या आहारावर नियंत्रण ठेवावे. १२० किलोकॅलरी दर किलोस, दररोज असे आहाराचे नियमित प्रमाण ठेवावे. बाळांना १०० किलो कॅलरीपेक्षा जास्त आहार देऊ नये. झोप आणि व्यायाम ह्या गोष्टी ध्यानात धरुन आहाराचे प्रमाण ठरवावे. अत्यल्प ऊर्जा निर्माण करणारे अन्न शक्यतो ताहन्या बाळांना देऊ नये. त्यामुळे बाळाची वाढ खुंटते. ऊर्जा आणि आहारमूल्ये यांचे प्रमाण संतुलित असे ठेवावे.

४. लोणी, चीज, चॉकलेट, आईसक्रीम, मांसाहारी पदार्थ, तळलेले पदार्थ, ब्रेड, केक,कँडी, बटाटे, पुडिंग असे पिष्टमय पदार्थ व शीत पेये देऊ नयेत.

५. काही घरगुती उपाय करून बघावे. लिंबू रस, मध, पाणी, रोज देणे हे अत्यंत आवश्यक आहे. एक चमचा ताजा मध वअर्ध्या लिंबाचा रस ग्लासभर कोमट पाण्यात मिसळून ते मिश्रण रोज दयावे. Also read 7 गुणकारी लिंबू पाणी पिण्याचे फायदे

बालवयातील-लठ्ठपणा-एक-नवी-आरोग्य-समस्या-घरगुती-उपाय

५. बोरांच्या पानांमुळे वजन कमी होते. मूठभर बोराची पाने रात्रभर पाण्यात भिजत घालावी. ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे. असे महिनाभर केल्यास वजन कमी होते. 

६. कोबिगड्डा हे पण एक चांगले औषध आहे. नवीन संशोधनमध्ये यात टार्टारिक ऍसिड असते असे आढळून आले आहे. त्यामुळे साखर आणि इतर कर्बोदके यांचे रूपांतर मेदामध्ये होत नाही. म्हणून कोबी हा वजन कमी करण्याचा  दृष्टीने महत्वाचा आहे. रोजच्या आहारात कोबी आवश्यक हवा. 

७. दोन टोमॅटो रोज सकाळी असे महिनाभर खाल्ले तर निश्चितपणे वजन कमी होते. शिवाय त्यातून इतर क्षारही मिळतात. वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायला हवा. त्यामुळे मेदाच्या रूपात असलेल्या कॅलरी कमी होतात.

 बालवयातील-लठ्ठपणा-एक-नवी-आरोग्य-समस्या
Food photo created by Racool_studio – www.freepik.com

८. योगासने करावी. सर्वांगासन, हलासन, भुजंगासन, शलभासन, वज्रासन हि आसने वजन कमी करण्याच्या कमी उपयुक्त आहे. जास्त घाम आणणारे व्यायाम करावे. स्टीमबाथ आणि मालिश हे प्रकार सुध्दा उपयुक्त आहेत. 

बालवयातील-लठ्ठपणा-एक-नवी-आरोग्य-समस्या
Woman photo created by master1305 – www.freepik.com

बालवयातील लठ्ठपणा – एक नवी आरोग्य समस्या (Childhood obesity) – माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!
      

Add Comment