जाणून घ्या- डांग्या खोकला घरगुती उपाय 11 लक्षणे व 5 कारणे कोणती ?

डांग्या-खोकला-घरगुती-उपाय-कारणे-व-लक्षणे
Cartoon vector created by brgfx – www.freepik.com

डांग्या खोकला घरगुती उपाय लक्षणे व कारणे – डांग्या खोकला हा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग नुकत्याच जन्मलेल्या बालकाला प्रतिकारशक्ती नसल्यामुळे होऊ शकतो. ज्या लहान मुलांचे वय १ वर्षाच्या आत आहे त्या मुलांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त असते. याच वयामध्ये मृत्यूचे प्रमाणसुद्धा जास्त असते. ५ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांना हा रोग होऊ शकतो. या रोगामुळे फुफुसांमध्ये गंभीर स्वरूपाचा उपद्रव निर्माण होतो. हा रोग जिवाणूंच्या संपर्कामुळे होतो. आणि थुंकीतून दुसऱ्या मुलांमध्ये पसरतो. रोगाच्या सुरवातीच्या काळात तो इतरांमध्ये वेगाने पसरण्याची शक्यता जास्त असते. खोकला सुरु झाल्यानंतर इतर मुलांना त्याचा क्वचितच संसर्ग होतो. चला तर बघूया डांग्या खोकला घरगुती उपाय कोणते ?

डांग्या खोकला लक्षणे – Symptoms whooping cough

१.डांग्या खोकला या रोगाच्या दोन अवस्था आहेत. पहिल्या आठवड्यात खोकला हा साध्या सर्दीपडश्यासारख्या असतो. एक आठवड्यानंतर तो अंगात पसरतो.
२. खोकल्याची उबळ येते.
३. मुलाला सतत खोकला येतो.
४. चेहरा गुदमरल्यासारखं लाल होतो.जिभ बाहेर येते.
५. डोळ्यातून पाणी येते.
६. खोकल्याच्या उबळीतुन मूल जेव्हा दीर्घ श्वास घेते त्यावेळीस कर्कश आवाज येतो. हा आवाज अर्धवट बंद पडलेल्या पडजिभेमुळे येतो.म्हणून याला व्हुपिंग कफ किंवा डांग्या खोकला म्हणतात.
७. डांग्या खोकला आल्यावर नाकातून आणि घश्यातुन चिकट कफ बाहेर येतो.उलटी सुद्धा होते. उबळ येऊन गेल्यावर मूल थकून खाली लवंडते.
८. ३/४ आठवड्यात खोकला कमी होत जातो. ८/१० आठवड्यानंतर खोकला पूर्ण बरा होतो.
९. ज्या मुलानं लस दिलेली असते याना हा रोग झालाच तर तो अगदी सौम्य स्वरूपाचा असतो. खोकल्याची उबळ तीव्र स्वरूपाची असेल तर डोळ्यांमध्ये रक्तस्त्राव होतो. मेंदूमध्ये मुलाला रक्तस्त्राव झाला तर मुलाला झटके येतात.
१०.काही वेळा चिकट कफामुळे श्वासनलिका कोंडतात आणि एक पूर्ण फुफुस निकामी होते. कधी कधी डांग्या खोकल्यानंतर न्यूमोनिया होतो किंवा मेंदूज्वर होतो.

डांग्या खोकला कारणे – Causes of whooping cough

१. बोर्डोटेला पेर्ट्यूसिस व बोर्डेला पॅरापर्ट्यूसिस नावाच्या जिवाणूंमुळे डांग्या खोकला होतो.
२. पहिल्या प्रकारचा खोकला तीव्र स्वरूपाचा असतो. दुसऱ्याप्रकारचा सौम्य स्वरूपाचा येतो.
३. या दोन जिवाणूंसोबत ऍडिनो विषाणू ,पॅरा- इन्फ्लुएन्झा विषाणू आणि श्वसनसंस्थेमध्ये विषाणू यांचा सुध्दा संसर्ग असतो.
४. डांग्या खोकला मूळ कारण मुलांच्या खाण्यातील अनैसर्गिक खाद्यपदार्थ , तसेच पौष्टीक आहाराचा, फळे आणि भाज्या यांचा अभाव हे आहे.
५. यामुळे शरीरामध्ये वाजवीपेक्षा जास्त श्लेष पदार्थ तयार होतात. हा श्लेष बाहेर टाकण्याच्या प्रयत्न मूल डांग्या खोकल्याद्वारे करते.

डांग्या खोकला घरगुती उपाय – Whooping cough home remedies

१. डांग्या खोकला घरगुती उपाय म्हणून सुरवातीला मुलाला काही दिवस संत्र्यांचा रस आणि पाणी सम प्रमाणात द्यावे. याशिवाय दूध किंवा दुसरे काही देऊ नये. रोज कोमट पाण्याच्या एनिमा द्यावा. याशिवाय दूध किंवा दुसरे काही देऊ नये. रोज कोमट पाण्याच्या एनिमा द्यावा. Also read 8 HEALTHY BENEFITS OF ORANGE IN MARATHI – संत्री फळाचे आरोग्यदायी फायदे

२. डांग्या खोकला घरगुती उपाय म्हणून बद्धकोष्ठ असेल तर एरंडेल तेल द्यावे. खोकल्याची उबळ आल्यावर पोटांचे स्नायू आखडून पोट दुखते. ते यामुळे थांबते. गळयावर आणि छातीवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या. इप्सम सॉल्टचे उष्ण स्नान सुद्धा लाभदायक आहे.

३. तीव्र लक्षणे कमी झाल्यानंतर मुलाला सफरचंद, संत्रे, अननस, पपई अशी ताजी फळे द्यावी. डांग्या खोकला घरगुती उपाय नंतर मुलाला वयानुसार पौष्टिक आहार सुरु करावा. यामध्ये फळे भाज्यांचे रस आणि दूध हे मुख्य घटक असावेत. रोग पूर्ण बरा झाल्यावर मुलाला मोकळ्या हवेत खेळण्यासाठी प्रोत्साहन दयावे. Also read 8 आरोग्यदायी अननस फळाचे फायदे मराठीत जाणून घ्या

४. डांग्या खोकल्र काही घरगुती उपाय लाभदायक ठरतात. यांपैकी लसूण अत्यंत महत्वाची आहे. लसणीचे सायरप दर वेळी पाच थेंब असे दिवसातून तीन वेळा लक्षणे कमी होईपर्यंत रोज द्यावे.

५. ताज्या आल्याचा रस मेथीच्या काढ्यामध्ये मध घालून द्यावा. यामुळे कफ पातळ होतो. एक चमचा मुळ्याच्या सायरप एक चमचा मध आणि थोडेसे सैंधव मिसळून ते दिवसातून तीन वेळा दयावे.डांग्या खोकल्यावर घरगुती उपाय लाभदायक ठरेल.

६.डांग्या खोकल्यावर घरगुती उपाय बदामाचे तेलही उपयुक्त आहे. बदामाच्या तेलात दहा थेंब  कांद्याचा आणि दहा थेंब आल्याचा रस घालून हे मिश्रण दिवसातून तीन वेळा असे पंधरा दिवस द्यावे आराम  पडतो. Also read फिट येणे – कारणे, लक्षणे व 7 घरगुती उपचार कोणते जाणून घ्या.

जाणून घ्या- डांग्या खोकला घरगुती उपाय 11 लक्षणे व 5 कारणे कोणती ? – माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

Add Comment