जाणून घ्या – दात किडण्याची कारणे व दातांसाठी घरगुती उपाय

Tooth Decay Vectors by Vecteezy

दात किडण्याची कारणे दात लवकर पडण्याचे मुख्य कारण दात किडणे आहे. साधरणतः दातावर डेंटिन आणि एनॅमल असे दोन प्रकाचे थर असतात. त्या थरांवर जिवाणूंचा हल्ला होतो व त्यामुळे दात किडायला सुरवात होते. सध्या आहाराचे स्वरुप व खाण्याची पद्धत जीवनशैली बदलल्याने जवळ जवळ सर्वांनाच दात किडण्याचा त्रास होऊ लागतो. तसेच गोड मऊ मुलायम पदार्थ खाल्याने सुध्दा दात लवकर किडतात. निरोगी दात हे चांगल्या आरोग्याचे व चांगल्या सौदंर्याचे लक्षण आहे.

दात घासण्याचा अनेक पद्धती आहेत. जर आपण दातांच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ब्रश वर्तुळाकार फिरवून दात साफ केले तर दात सर्व कोनातून चांगले घासले जातात. घासताना ब्रश हिरड्यांवरुन जरी फिरवला तर चांगले आहे. त्यामुळे हिरड्यांची चांगली मालिश होऊन रक्तभिसरण सुधारते.

तस बघायला गेल तर दातांवरचे किटाणू टूथपेस्ट वापरुन जात नाही. परंतु त्यामुळे तोंडाला तजेलपणा येतो. साधरणतः सगळ्याच टूथपेस्ट मध्ये फ्लोराइड असल्यामुळे दातांना बळकटी येते. आणि दात किडण्यापासून संरक्षण होते. चला तर बघूया दात किडण्याची कारणेदातांसाठी घरगुती उपाय

दात किडण्याची कारणे व लक्षणे कोणती ?

१. अपौष्टिक आहार घेतल्याने क्षार नसलेल्या जमिनीत तयार झालेले अन्न पदार्थ खाल्यामुळे दात किडू शकतात.
२. केक, पेस्टरी चे पदार्थ, गोड पदार्थ, थंड पाणी पिल्याने, थंड पदार्थ खाल्याने दात किडू शकतात.
३. आपल्या शरीरात कर्बोदके, जीवनसत्वे, क्षार यांची कमतरता झाल्याने सुध्दा दात किडतात.
४. दातांच्या फटीत अन्नकण अडकून बसल्याने त्या अन्नकणांवर जिवाणू वाढू लागतात त्यामुळे सुद्धा दाताला कीड लागते.
५. दात किडण्याची कारणे सारखे सारखे अन्न खाणे चांगले नाही कारण त्यामुळे दातावर आम्ल तयार होतात. आणि जंतू लवकर वाढू लागतात.
६ थंड किंवा गरम वस्तू खाल्याने दाताला ठणका लागतो.
७. अन्न खाताना चावताना त्रास होऊ लागतो.
८. दातांच्या मुळाशी पू साचल्यावर वेदना जास्त होतात.

दातांसाठी घरगुती उपाय

दात-किडण्याची-कारणे-व-दातांसाठी-घरगुती-उपाय
Tooth Decay Vectors by Vecteezy

1.दात किडणे ह्यावर दातांसाठी घरगुती उपाय म्हणून लहान मुलांच्या आहारात लिंबूचा समावेश करणे. कारण लिंबू मध्ये सी जीवनसत्वप्रमाणे क जीवनसत्व देखील भरपूर प्रमाणात असतात. क जीवनसत्वामुळे दात व हिरड्या मजबूत होण्यास मदत होते. Also read K Jivansatva Benefita in Marathi

2.दात निरोगी व स्वच्छ राहण्यासाठी रोज घासणे आवश्यक आहे जेवणानंतर सुद्धा दात घासायला हवेत. घाई घाई ने दात घासल्यास नीट स्वच्छ होत नाही.त्यासाठी दिवसातून एकदा तरी दात स्वच्छ नीट घासणे जरुरी आहे.

3.कांदा खाल्यामुळे दात किडत नाहीत असे एका संशोधनात दिसून आले आहे. कारण कांदयामध्ये जिवाणू नष्ट करण्याचे गुणधर्म असतात. कारण कांदा जर चांगला चावून खाल्ला तर तोंडांतले सगळे जंतू मरुन जातात. ज्या ठिकाणी दात दुखतात त्या ठिकाणी कांदा ठेवला तर दात दुखण्याचं प्रमाण कमी होत.

4.सफरचंद खाल्यामुळे तोंड ब्रशने साफ केल्यासारखे वाटते.कारण ह्यामध्ये आम्लतेचे गुणधर्म असतात. सफरचंद मध्ये असलेल्या ह्या आम्ल गुणधर्मामुळे तोंडातले जंतू मरुन जातात.म्हणून सफरचंद हे चांगल्याप्रकारे चावून खायला हवे. सफरचंद हे दातांचे नेसर्गिक पणे संरक्षण करत असतात.

5.जेवण करताना आहारामध्ये कच्या कोशिंबिरी खाणे सुध्दा चांगले आहे कोशिंबिरी मुळे हिरड्यांची मालिश होते हिरड्यांची मालिश झाल्यामुळे हिरड्या घट्ट होतात. आणि दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण देखील निघून जाते. कच्ची कोशिंबीर खाल्यामुळे दात चांगले स्वच्छ साफ राहतात.

6.दातांचे किडणे रोखण्यासाठी चांगला आहार घेणे महत्वाचे आहे. तसेच तो केव्हा व कधी घ्यायचा हे सुद्धा महत्वाचे आहे. सारखं सारखं खाणे सुद्धा दातांसाठी खाणे चांगले नाही. कारण त्यामुळे काय होत आम्ल जास्त तयार होत. आणि त्यावर जंतू तयार होऊ लागतात. व त्यांचा प्रसार जोमाने वाढू लागतो. गोड पदार्थ खाण्यामध्ये दररोज येत असतील तर दात किडण्याचे कारणे प्रमाण जास्त असते. म्हणून गोड पदार्थ जेवणात सगळ्यात शेवटी खावे.

7.दातांचे आरोग्य हे आपल्या आहारावर अवलंबून असते. एकदा दात पूर्ण तयार झाले तर त्या दातांचे पुढचे आयुष्य तुम्ही काय खाता ह्यावर अवलंबून असते. दातांचे किडणे दातांच्या मुळाशी असलेल्या हांडाची झीज आणि हिरडयांचे आरोग्य हे सर्व पौष्टिक आहार करुन टाळता येते. पौष्टिक आहार केल्यामुळे दात व जबडयांची हाडे दिवसेंदिवस अधिक निरोगी व बळकट होत जातात. दात किडण्याची कारणे कमी होतात.

8.दात किडण्याची कारणे ही सर्व प्रकारचे गोड पदार्थ आणि तसेच रिफाइड पदार्थ मैदा व साखर पासून तयार केले पदार्थ आहेत ते पदार्थ खाऊ नयेत. त्या पदार्थामध्ये तंतुमय घटक असल्यामुळे त्यामधले अन्नकण दाताला चिकटून राहतात व त्यामुळे दात किडण्याची शक्यता जास्त असते.

तर मित्रांनो जाणून घ्या .दात किडण्याची कारणे व दातांसाठी घरगुती उपायमाहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!

आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

Add Comment