6 औषधी खजूर खाण्याचे फायदे आणि घरगुती उपाय

खजूर-खाण्याचे-फायदे-आणि-घरगुती-उपाय
dates eating benefits and home remedies in marathi

ताज्या फळाला खजूर तर सुकवलेल्या फळाला खारीक असे म्हटले जाते . तपकिरी रंगाचं हे फळ बोराएवढं लांब असत. व त्यात लांबट आकाराची बी असते. बी भोवतालचा गर हा पौष्टिक, गोड व भूक भागविणारा असतो. यातील साखर हि रक्तात लवकर शोषली जाते. खजूर खाण्याचे फायदे आणि घरगुती उपाय कोणते ?

खजूर आपल्या त्वचेसाठी खूप चांगले आहे खजूर खाल्यामुळे आपल्या चेहऱ्यवार तेज दिसून येते. आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

खारीक मुळे  वजन वाढू शकते. ह्यात शुगर आणि फायबर ची मात्रा जास्त प्रमाणात असतात. म्हणून वारंवार खजूर खाल्याने वजन वाढू शकते. खजुरात मध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या गॅस सारख्या समस्येवर खूप फायदेशीर आहे.    

वैज्ञानिक नाव: फिनिक्स डॅक्टिलीफेरा ( Phoenix dactylifera)
इंग्रजी नाव: डेट्स (Date palm)

खजूर खाण्याचे फायदे – Dates Eating Benefits

 1.वजन वाढवणे ( Good For Weight Gain)

खजूर खाण्याचे फायदे खूप आहेत. आपले वजन वाढत नसेल . तुमची शरीराची रचना किरकोळ बारीक असेल तर वजन वाढवण्यासाठी खजूर तुमची मदत करतो. ह्यात व्हिटॅमिन आणि प्रोटीन जास्त प्रमाणात असतात त्यामुळे आपल्याला वजन वाढण्यासाठी मदत होते बारीक असणाऱ्या वक्तींनी रोज ४-५ खजूर खाण्यास सुरवात केली तर त्यांचं वजन वाढेल . 

 2.हाडांचे आरोग्य सुधारते (Improves Bone Health)

 खजूरमध्ये व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम , मॅग्नेशियम असल्याने आपल्या हाडांची चांगली वाढ होते. D Jivansatva कमतरतेमुळे हाडे कमजोर होऊ लागतात. खजूर खाण्याचे फायदे मुळें तुम्हाला तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते खजूरमध्ये लोह, खनिज, कॉपर , सेलेनियम यांचे प्रमाण अधिक असते . त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात . 

3.पचनक्रिया (Improves Digestive Systems)

 रात्री खारीक भिजवून ठेऊन दुसऱ्यादिवशी सकाळी खाल्यास ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भूक वाढवण्यासाठी खारीक दुधात उकळून घ्या थोड्यावेळाने दुध थंड झाल्यावर खारीक बारीक करून दूध पिऊन घ्या. हे दूध आपल्यासाठी पौष्टिक असते हयामुळे आपली भूक वाढते आणि अन्न आपल्याला सहज चांगले पचते.ज्यांना अपचनाचा त्रास आहे तसेच कफ चा त्रास आहे त्याना खजूर(Dates) खाणे अत्यंत लाभदायी ठरेल . 

Photo by Riki Risnandar from Pexels

4.मज्जसंस्था मजबूत (Nerve Stabilization)

खजूर तसेच खारका आपल्या मज्जासंस्था मजबूत ठेवण्यास मदत करतात. खजूर खाण्याचे फायदे खजुरामुळे आपली रक्तदाबपातळी नियंत्रित राहते. खजूर मध्ये पोटॅशियम असल्यामुळे आपल्या मेंदूची गती व क्षमता  वाढण्यास मदत होते. खजुरामध्ये व्हिटॅमिन असल्यामुळे मानवी मज्जासंस्थेचे आरोग्य व कार्यक्षमता वाढते.

5.लहान बाळांसाठी (Healthy For Kids)

लहान मुलांना जेव्हा दात येतात तेव्हा त्यांना तोंडात काहीतरी घालण्याची व काहीतरी चघळण्याची  इच्छा होत असते.  त्यावेळेस एक खारीक खजूर दोरीत गुंडाळून बाळाच्या मनगटाला बांधली  तर लहान बाळाचं  चघळणे हे अगदी पौष्टिक होऊन जाईल.

6.त्वचेसाठी फायदेशीर (Healthy For Skin) – खजुरात कॅल्शियम, आयरन, Vitamin B, Vitamin B2, A Jivansatva मुबलक प्रमाणात असल्यामुळे खजुरात असणारे हे व्हिटॅमिन्स आपली त्वचा चमकदार बनवतो व त्वचा गोरी दिसते. तस खजूर खाण्याचे फायदे खूप आहे खजूर खाल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर येत नाही. चमकदार ठेवण्यास मदत करतात.

खजूर घरगुती उपाय – Dates Home Remedies

१. ज्या स्त्रियांना पाय दुखणे,कंबर दुखणे अश्या समस्या आहेत त्यांनी एक घरगुती उपाय म्हणून ५ खजूर अर्धा चमचा मेथी दोन ग्लास पाणी हे पाण्याची मात्रा अर्धी होईपर्यंत उकळावे. पाणी थोडे कोमट झाल्यावर ते पिऊन घ्यावे त्याने आपल्याला आराम भेटेल. 

२.ज्यांना गॅस ची समस्या आहे ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी रोज  रात्री ४-५ खजूर पाण्यात भिजवून ठेवावे आणि  सकाळी  ते भिजवलेले खजूर चांगले बारीक करून त्याच पाण्यात टाकून ते पाणी प्यावे त्याने आपले पोट चांगले साफ होते.

3.ज्यांना पाय दुखण्याचा त्रास असतो किंवा गाठ येण्याचा त्यावर एक घरगुती उपाय म्हणून एक चमचा गायीच तूप, एक कप दुधासोबत एक चमचा खारीक पावडर मिक्स करुन गरम असताना प्यावे. त्यामुळे गाठ व पाय दुखण्याच्या त्रास कमी होण्यास मदत होईल.

खजुरात असणारे औषधी घटक – Essential Ingredients in Dates

पोषकतत्वे (Niutritions)खनिजे(MInerals)जीवनसत्व(Vitamins)
प्रोटीन : २.०ग्रॅममॅंग्नेशियम : १४%व्हिटॅमिन बी : १२ %
फॅट : ०.०ग्रॅमपोटॅशियम :२०%
कार्बोहैड्रेट्स : ७५.०ग्रॅमकॉपर : १८%
शुगर :०.० ग्रॅममॅग्नेशियम :१५%
फायबर :७.० ग्रॅमआयरन:५%

खजूर खाण्याचे फायदे आणि घरगुती उपाय – माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!

आपल्या आरोग्याची काळजी घ्या …. घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!

Add Comment