फिट येणे – कारणे, लक्षणे व 7 घरगुती उपचार कोणते जाणून घ्या.

फिट येणे - कारणे लक्षणे व घरगुती उपचार कोणते जाणून घ्या
Image by Gerd Altmann from Pixabay

फिट येणे – कारणे , लक्षणे व घरगुती 7 उपचार कोणते – फेफरे आणि इंग्रजीत एपिलेप्सी असं म्हणतात. आयुर्वेदात त्याला अपस्मार असं नाव आहे.
मिर्गी (एपिलेप्सी ) बाधा झालेला रोगी वारंवार घेरी येऊन बेशुद्ध पडतो. प्रत्येक वेळेस झटके येतात. काही वेळा तेही येत नाहीत. हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा आजार असून मेंदूतील विदुयत क्रियेमध्ये बिघाड झाल्यामुळे तो होतो. मुलांना तसाच मोठ्यांनाही होतो. पण झटके येण्याची सुरवात लहानपणी होते. वयोमानानुसार झटके कमी होतात.
फिट येणे हा रोग पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. एपिलेप्सी हा ग्रीक शब्द आहे. ‘पछाडणे’ असा त्याचा अर्थ आहे झटके येणाऱ्या माणसाला भुताने पछाडले असा त्या काळी समज होता. हा दैवी रोग आहे असे ते मानीत. ख्रिश्चन धर्मात शरीरात सैतान शिरला म्हणजे झटके येतात, असा समज त्या काळात होतो.

फिट येणे लक्षणे – Symptoms of Epilepsy

१.फक्त एकदाच झटके आले तर ते मिरगीचेच आहेत असे समजू नये.
२.फिट येणे मिरगीचे झटके मधून मधून अचानक आणि अनियमितपणे येतात. झटके येऊन मुलगा बेशुद्ध पडतो.
३.फिट येणे – दोन प्रकार आहेत. ‘पेटिट माल ‘ आणि ग्रँड माल ‘.
४. पेटीट माल हा त्या मानाने सौम्य प्रकार आहे. यात झटका अवघ्या काही क्षणात येतो आणि जातो.
५.क्षणभर तो मुलगा भानावर नसतो एवढेच. मात्र यात हातपाय वाकडे होत नाहीत. किंचित अंग ताठरते किंवा डोळे, मान, हातपाय यांना क्षणिक झटका येतो.
६.रोगी पूर्ण बेशुद्ध पडत नाही किंवा तोल जाऊन जमिनीवरही पडत नाही.
७.झटका त्याला समजत सुद्धा नाही. असे झटके आयुष्यात केव्हाही येतात. पण मुलांमध्ये ते जास्त येतात.
८.ग्रँड माल प्रकारात यांचे स्वरूप त्रीव्र असते. हातपाय आणि पूर्ण शरीर वेडेवाकडे होऊन झटके येतात.
९.रोगी अचानक बेशुद्ध पडतो. याची सुरवात होताना काही जणांना त्याची पूर्वसूचना मिळते. मुलांना ते सांगता येत नाही. पण आईला ते ओळखता येते.
१०.झटका येताना मुलगा जोरात ओरडतो. खाली पडतो. बेशुद्ध होतो. आणि अंगाला पुन्हा पुन्हाही झटके येतात.
११.चेहऱ्याच्या स्नायूंचे पण आकुंचन – प्रसरण होते. जीभ चावली जाते.
१२.मान, हात, पाय वेडेवाकडे होतात. डोळे पांढरे होतात. मल मूत्राचे झटक्यात विसर्जन होते. हा झटका काही मिनिटे राहतो. त्यानंतर मुलगा गाढ झोपी जातो.
१३.जाग आल्यावर त्याचे मन गोंधळले असते. तो चिडचिड करतो. त्याला आधीचे काही एकाएकी आठवेनासे होते.
१४.पहिला झटका येतो तेव्हा साहजिकच आईववडील घाबरून जातात.
१५.मुलगा आता यातून वाचत नाही असे त्यांना वाटते. पालकांनी या रोगाचे स्वरूप समजून घ्यायला हवे. एवढे घाबरण्यासारखे त्यात काही नसते.

फिट येणे कारणे – Causes of Epilepsy

१.मेंदूमधील काही पेशींमध्ये बिघाड झाल्यामुळे तेथील विदुतक्रियांमध्ये अडथळा येतो. म्हणून झटके येतात.
२.फिट येणे बहुतेक हि बाधा अनुवांशिक असते.
३.अपचन आतडयांमध्ये साठवलेले विषारी घटक आणि मानसिक ताण हि यांची आणखी काही कारणे आहेत.
४.” ग्रँड माल ” हा प्रकार बहुधा अनुवांशिक कारणांमुळे किंवा अपघातात मेंदूला मार लागल्यामुळे होतो.
५.मेंदूज्वर विषमज्वर अशा आजारांत किंवा सततच्या जास्त तापामुळे सुद्धा हा रोग होण्याची शक्यता असते.
६.ऍलर्जी विशेषतः मासांहारी पदार्थाची – हे आणखी एक कारण आहे.

फिट येणे घरगुती उपचार- Home remedies for Epilepsy

१. यांवरील उपचारात फार महत्व आहे. पहिले काही दिवस केवळ फळांचा रस दयावा. संत्रे, सफरचंदफ, द्राक्षे, पीच, पिअर, अननस, टरबूज अशा प्रकारची फळे दयावी. नंतर हळू हळू सकस आहार सुरु करावा.Also read 8 आरोग्यदायी अननस फळाचे फायदे मराठीत जाणून घ्या

२. फिट येणे घरगुती उपचार – कच्च्या कोशिंबिरी आहारात असाव्यात. बकरीचे दूध, दही, लोणी, पनीर, हीही उपयुक्त आहेत. मांसाहारी पदार्थ अजिबात देऊ नयेत. त्यामुळे शरीरातील मॅगनेशियम व ब ६ जीवनसत्व यांचा नाश होतो. या दोन्हीची मिरगीमध्ये अत्यंत आवश्यक्यता असते.

३.सुका मेवा, सोयाबीन, पालेभाज्या, बीट यांमध्ये मॅग्नेशियम भरपूर असते. तळलेले पदार्थ, चहा, कॉफी, लोणची देऊ नयेत. एका वेळस जास्त खाण्यापेक्षा तेवढेच अन्न विभागातून दिवसातून चार-पाच वेळा खावे. रात्री जास्त खाऊ नये.

४.फिट येणे काही घरगुती उपाय आहेत. द्राक्षांच्या रस यांवर अत्यंत गुणकारी आहे. २५० मि.लि द्राक्षांचा रस दिवसातून तीन वेळा असा तीन महिने सतत दयावा. यामुळे चांगलाच फरक पडतो.

५.गाजराचा रस १५० मि .लि बीट आणि काकडी यांचा रस प्रत्येकी ५० मि लि बिट आणि काकडी यांचा रस प्रत्येकी ५० मि .लि असे २५० मि लि मिश्रण रोज दयावे. ब ६ किंवा पायरॉडॉक्सीन हे जीवनसत्व मिरगीमध्ये अत्यंत उपयुक्त असते. मेंदूच्या कार्यांसाठी ते आवश्यक असते. दूध, उसळी, हिरवी पालेभाजी, गाजर, शेंगदाणे यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर असते.

६.फिट येणे ह्या आजारावर ब्राम्ही हि वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. अर्धा चमचा ब्राह्मी रस व अर्धा चमचा मध हे मिश्रण दिवसातून तीन वेळा दयावे. अर्धा ग्राम जटामांसी रोज दिल्याने सुद्धा फरक पडतो. हि वनस्पती चेतासंस्थेला साहाय्यभूत ठरते. आणि मन शांत करते. जलकांन व्हेलेरीस हि वनस्पती सुद्धा फिट येणे ह्या आजारावर गुणकारी आहे. १५ ग्राम वनस्पतीचा रस २५० मि लि पाण्यात टाकून काढा करावा. आणि दिवसातून ३ वेळा तो दयावा.

७.शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी मातीचा लेप द्यावा. रोज एकदा पोटावर लावावा. मस्तकाच्या मागच्या भागाला गरम आणि थंड पाण्याचा शेक दयावा दिवसातून दोन वेळा दयावा. औषधे चालू असतील तर तो यासाठी अचानक बंद करू नयेत. हळूहळू कमी करावी. मुलांवर जास्त बंधने घालू नयेत. त्यांचे पोहणे, सायकल चालवणे हे मात्र बंद करावे. कारण अपघात होण्याची शक्यता असते.

फिट येणे – कारणे, लक्षणे व घरगुती उपचार कोणते जाणून घ्या. – माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

Add Comment