गोवर आजारची लक्षणे व गोवर आजारासाठी घरगुती उपाय जाणून घ्या कोणते आहेत ?

Disease Vectors by Vecteezy

गोवर आजारची लक्षणे व घरगुती उपाय गोवर हा लहान मुलांना होणारा आजार आहे. हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे. बहुतेक साधरणतः हा आजार सर्वच देशात आढळतो. बहुतेक हिवाळ्यात या रोगाची साथ येते.गोवर झालेल्या लहान मुलांना ताप जास्त येतो.

गोवर आजारची लक्षणे लहान मुलांना सर्दीची लक्षणे दिसू लागतात. तसेच गोवर या आजारामुळे न्यूमोनिया होऊ शकतो असे म्हटले जाते. गोवर आजारामुळे ब्राँकायटिस, कान फुटणे, टी .बी सारखे आजार सुद्धा होऊ शकतात. तसेच सगळ्यात गंभीर आजार म्हणजे मेंदूज्वर हा आजार देखील होतो.

गोवर आजारची लक्षणे – Symptoms Of Measles

१.ज्या मुलांना आधी गोवर झालेला नसेल त्यांना तो साथीच्या दिवसांत होण्याची जास्त शक्यता असते.
२.शरीरामध्ये व्हायरसचा प्रवेश झाल्यानंतर साधरणतः १४ दिवसांनी लक्षणे दिसू लागतात.
३. ताप येतो , नाक वाहते, डोळ्यातून पाणी येते, खोकला येतो.
४. चेहरा, डोळ्यांच्या पापण्या सुजतात, डोळे लाल होतात.
५. डोळ्यांना प्रकाश सहन होत नाही.
६. गोवर आजारची लक्षणे गिळायला त्रास होतो, घसा सुजतो, भूक लागत नाही.
७. तीन चार दिवसांनी अंगावर पुरळ येतो. पुरळ लहान ठिपक्यांसारखा असतो.
८.पुरळामधील त्वचा लालसर असते. सर्वांत आधी पुरळ चेहऱ्यावर व मानेवर येतात आणि अंगभर पसरतात.
९.सर्वांत शेवटी तो हातापायांवर दिसतो. आधी तो गुलाबी दिसतो मग हुळू हळू तो गडद होत जातो.
१०. गोवर मध्ये ताप जास्त असतो. गोवर आजारची लक्षणे सर्दीची असतात. गोवरामुळे लहान मुलांना न्यूमोनिया होऊ शकतो.

गोवर आजारची कारणे- Causes of Measles

१. गोवर (Measles)हा आजार व्हायरस मुळे होणारा आहे. संसर्गजन्य रोग आहे. पाच वर्षाखालील मुलांना तो जास्त प्रमाणात होतो.
२. मूल आईच्या गर्भात असताना तिच्या रक्तातून मुलांना रोगप्रतिकार घटक त्यांच्या शरीरात जातात. पण मूल जन्माला आल्या नंतर सहा महिनेच बाळाचे रोगांपासून संरक्षण करू शकतात.असे सांगितले जाते.
३. गोवर झालेल्या मुलांच्या वाहणाऱ्या नाकातून किंवा खोकल्यातून व्हायरस हवेत पसरु शकतात. आणि इतर मुलांना त्यांची लागण होते.

गोवर आजारासाठी घरगुती उपाय –
Home Remedies for Measles

Disease Vectors by Vecteezy

1.संत्रीचा (Orange) किंवा लिंबाचा (Lemon) रस पाणी मिसळून दयावा. गोवरामध्ये मुलांना भूक नसते. मुलाला हवेशीर  खोलीत झोपवावे. डोळे सुजल्यामुळे प्रकाश सहन होत नाही. खोलीमधील प्रकाश मंद असावा. Also Read संत्री फळाचे आरोग्यदायी फायदे

गोवर-आजारची-लक्षणे-व-घरगुती-उपाय
Background vector created by macrovector – www.freepik.com

2.सुरवातीला कोमट पाण्याचा एनिमा दयावा. सकाळ संध्याकाळ छातीवर आणि पोटावर मातीचा लेप लावावा. कोमट पाण्याने अंघोळ घालावी. पाण्यात कडू निंबाची पाने टाकावी.

3.लक्षणे हळू हळू कमी झाल्यावर आणखी दोन तीन दिवस फळांचा रस आणि फळे असा आहार दयावा. संत्री,मोसंबी, द्राक्षे, सफरचंद, आंबा अशी फळे दयावी. त्यानंतर हळूहळू सकस आणि पौष्टिक आहार सुरु करावा. Also read Healthy Benefits of mango in Marathi

गोवर-आजारावर-घरगुती-उपाय-व-हेल्थी-फ्रुटस
Photo by Trang Doan from Pexels

4.काही घरगुती उपाय करून बघावे. लहान मुलांना संत्र खायला दयावी. किंवा संत्रीचा ज्युस संत्रीचा रस प्यायला दयावा. संत्री च्या रसामुळे तोंडाला चव येते. भूक सुधारते. .घरगुती उपाय म्हणून लिंबू सुद्धा गुणकारी आहे. लिंबाचा सरबत बनवून प्यावे. 

गोवर-आजारावर-लिंबाचे-घरगुती-उपाय
Photo by Maximiliano Carrizo from Pexels

5.हळदीच्या झाडाची  मुळे उन्हात वाळवून त्यांची बारीक पूड करावी. त्यात मध आणि कारल्याच्या पानाचा रस मिसळून ते मिश्रण लहान मुलांना दयावे.

6.गोवर झालेल्या मुलाला इतर मुलांमध्ये मिसळू देऊ नये स्वछ्तेची काळजी घ्यावी. त्यामुळे आजार लवकर बरा होण्यास मदत होते.

8.गोवर आजारासाठी घरगुती उपाय म्हणून मुळेथीचे चूर्ण मधात मिसळून लहान मुलांना दयावे. बार्लीचे त्यालाच जव असे म्हणतात. त्याचे पाणी गोवराच्या खोकल्यावर चांगले काम करते त्यामध्ये बदामाचे तेल मिसळून ते दिवसभर थोडे थोडे लहान मुलांना प्यायला दयावे त्याने थोडा अराम भेटेल.

गोवर आजारची लक्षणे व गोवर आजारासाठी घरगुती उपाय जाणून घ्या कोणते आहेतमाहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

Add Comment