जाणून घ्या जुलाब वर घरगुती उपाय कोणते त्याची लक्षणे व कारणे कोणती ?

Man vector created by brgfx – www.freepik.com

जुलाब वर घरगुती उपाय कोणते ? जुलाब आजार बाळांना आणि लहान मुलांना नेहमी होणारा सामान्य आजार आहे. अनेक वेळा पातळ पाण्यासारखे शौचाला होत असेल तर त्याला जुलाब असे म्हणतात. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची ती एक नैसर्गिक प्रकीया आहे. कुपोषण व अनारोग्यामुळे लहान मुलांमध्ये हा आजार वाढतो. आपल्याच देशात नाही तर अनेक बाहेरच्या इतर देशांमध्येही हा आजार बऱ्याचदा लहान मुलांचा मृत्यू होण्यास कारणीभूत ठरतो.

सतत होणाऱ्या उलट्या व जुलाब यामुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण कमी होते. लवकर उपचार केले नाहीत तर गंभीर परीणाम होऊ शकतात. उलट्या जुलाब दोन्ही असेल तर शरीरातील पाण्याची कमतरता कमी होते. व लवकर उपचार केले नाहीत तर मृत्यू सुध्दा होऊ शकतो. साधारणतः सहा महिने ते दोन वर्ष वयोगटातील मुलं या आजाराला जास्त बळी पडतात.चला तर बघूया जुलाब वर घरगुती उपाय कोणते त्याची लक्षणे व कारणे कोणती ?

जुलाबची लक्षणे – Symptoms of Diarrhea

१. जुलाबाचे दोन प्रकार पडतात. साधा आणि जिवाणूजन्य.
२.सध्या जुलाबामध्ये उलट्या आणि पोट दुखून येणे अशी लक्षणे असतात.
३.साध्या जुलाबामध्ये अगदी सावकाश सुरवात होते. जुलाब पहिले लक्षण.
४.दिवसातून पाच ते दहा वेळा जुलाब होते.
५. सुरवातीला पातळ हिरव्या रंगाची जुलाब होते.
६. नंतर आव पडायला सुरवात होते.
७. ताप सुध्दा येऊ लागतो.
८. जुलाब थांबले नाही तर, त्याचे रूपांतर जिवाणूजन्य जुलाबा मध्ये होते.
९. जिवाणूजन्य जुलाब मध्ये आजार अचानक सुरु होतो.
१०. जुलाब, ताप, उलट्या मुख्य लक्षणे असतात.
११. ह्या प्रकार मध्ये जुलाब अतिशय मोठे व रक्तासारखे असते.
१२. नंतर ते हिरवट व तांबूस रंगांचे होतात.
१३. शुष्कता व डिहायड्रेशन सारखी लक्षणे दिसू लागतात.
१४. पोटाची त्वचा गरम व कोरडी बनते.
१५. खूप तहान लागते. लघवीचे प्रमाण कमी होते.

जुलाबची कारणे – Causes of Diarrhea

१. अस्वछ दूध आतड्याना झालेला जिवाणूंचा संसर्ग
२. अस्वछता अन्नपदार्थ तयार करताना घेतलेला निष्काळजीपणा.
३. बाळ आईच्या अंगावरचा दूध पीत असेल आणि आईला जुलाब होत असतील तर मुलाला त्याची लागण होऊ शकते.
४. मोठ्या मुलांमध्ये चुकीच्या आहार पद्धतीमुळे मासांहारी पदार्थ जास्त खाणे.
५. पोट साफ होण्यासाठी सतत औषध घेत राहणे.
६. चीडचीडेपणा होणे.

जुलाब वर घरगुती उपाय – Home remedies for Diarrhea

1.जुलाब वर घरगुती उपाय म्हणून मुलांना गाजराचे सूप प्यायला देणे. अर्धा किलो गाजर २५० मिलिलिटर पाण्यात उकडून घ्या त्यानंतर ते मिक्सर मध्ये काढून त्यांचे पाणी गाळून पिणे व त्यात थोडस चिमूटभर मीठ टाकावे. अर्ध्या अर्ध्या तासाने हे सूप थोडे थोडे करून पिण्यास दयावे. गाजराचे सूप पिल्यामुळे मुलांच्या शरीरात झालेली पाण्याची कमतरता भरुन निघते.

जुलाब-वर-घरगुती-उपाय
Food photo created by freepik – www.freepik.com

2.जुलाबामुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. जुलाब थांबवण्यासाठी डाळिंबाचा रस पिणे शरीरासाठी लाभदायी आहे.त्याने शरीरातील अशक्तपणा कमी होतो किंवा निघून हि जातो. Also Read POMEGRANATE 6 HEALTHY BENEFITS IN MARATHI

 जुलाब-वर-घरगुती-उपाय
Background photo created by Racool_studio – www.freepik.com

३.जुलाब वर घरगुती उपाय ताक पिणे हे देखील जुलाबावर चांगला घरगुती उपचार आहे. आपल्या शरीराला मदत करणारे काही जिवाणू आतड्यांमध्ये असतात.ताक पिल्याने ते जिवाणू जुलाबामधून बाहेर निघतात. दिवसातून दोन तीन वेळा एक एक कप ताक पिणे जुलाब कमी होण्यास फायदेशीर ठरेल.

4. जुलाब वर घरगुती उपाय म्हणून लहान मुलांचे पोट दुखत असल्यास पोटाला गरम पाण्याचा शेक सुध्दा देऊ शकतो. लहान मुलांचा कंबरेखालचा भाग गार पाण्यात बुडवून ठेवल्यास जुलाब थांबण्यास मदत होते.

5. साधे जुलाब फारसे गंभीर नसतात  ज्या कारणांमुळे कारणांमुळे झाला असेल त्यांचे निरसन केले कि जुलाब थांबतात. मुलाला दिवसभर संत्र्यांचा रस निम्मे पाणी टाकून दयावा. त्यामुळे तब्येत सुधारायला मदत होते. योग्य आहार सुरु केला तर  सहसा पुन्हा जुलाब होत नाहीत. Also Read 8 HEALTHY BENEFITS OF ORANGE IN MARATHI

 जुलाब-वर-घरगुती-उपाय

6. विषाणूजन्य जुलाब असतील तर लहान मुलांना विश्रांतीची गरज असते. आतडयातले विषारी घटक काढून टाकण्यासाठी पहिले दोन तीन दिवस कोमट पाण्याचा एनिमा दयावा त्यामुळे पोटातील वायू बाहेर पडतो आणि जुलाब पण कमी होतात.

जाणून घ्या जुलाब वर घरगुती उपाय कोणते त्याची लक्षणे व कारणे कोणती ? माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

Add Comment