7 गुणकारी लिंबू पाणी पिण्याचे फायदे

लिंबू-पाणी-पिण्याचे-फायदे
Food photo created by KamranAydinov – www.freepik.com

लिंबू पाणी पिण्याचे फायदे भरपूर आहेत. कारण लिंबू फळामध्ये सी जीवनसत्व  भरपूर प्रमाणात आहे. लिंबू एक इम्युनिटी बूस्टर फळ आहे. या फळात असण्याऱ्या पोषकतत्वांमुळे व्हिटॅमिन सी मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आपली इम्युनिटी पॉवर चांगली असली तर आपल्याला कोणताही आजार लवकर होत नाही. लिंबू फळा मुळे तुमचं वजन कमी करण्यास मदत होते. शरीरातला PH लेवल नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. लिंबू फळाचे नियमित व नियंत्रित पणे सेवन केल्याने किडनीस्टोन सारखे आजार लवकर होत नाही.

लिंबू पाणी पिण्याचे फायदे – Lemon Water Benefits

1. वजन कमी करण्यास मदत करते (Helps to loose weight)

तुम्हाला जर असं वाटतेय कि तुमचं वजन खूप वाढतंय आणि खूप उपाय करून सुद्धा काही फरक पडत नाही आहे तर तुम्ही रोज सकाळी उठून गरम कोमट पाण्यात निंबू आणि मध एकत्र मिक्स करुन ते पाणी प्यावे. कमीत कमी दोन तीन महिने हा उपाय करुन बघा हयामुळे नक्कीच तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यास मदत होईल. लिंबू गरम कोमट पाण्यामध्ये टाकून पील्याने आपली शरीरातील व पोटाची चरबी वितळते त्यामुळेच आपलं वजन देखील कमी होऊ लागते.

2.सर्दी खोकला वर फायदेशीर आहे(Beneficial for cold cough):

कधी कधी वातावरण अचानक बदलते वातावरणात बदल झाल्यामुळे आपल्याला सर्दी खोकला सारखे आजार होऊ लागतात. सर्दी होऊन अचानक छातीत कफ तयार होऊ लागतो तसेच घसा बसतो. अश्यावेळी गरम पाण्यात थोडासा लिंबू टाकून पिल्याने आपल्या शरीरासाठी खूप फायदा होतो. गरम पाणी पिल्यामुळे कफ कमी होण्यास मदत होते व घश्याला अराम मिळतो.व लिंबू मध्ये असणाऱ्या सी जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते

 3.त्वचेसाठी फायदेशीर (Healthy For Skin):

गरम पाण्यात लिंबू टाकून पिल्यामुळे आपली त्वचा चमकदार व मुलायम राहते. लिंबू पाणी पिण्याचे फायदे मुळे आपल्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या व पिंपल्स येत नाही. लिंबू पाणी पिणे आपल्या शरीरासाठी कधीही फायदेशीरच आहे. लिंबू पाणी चे सेवन नियमित केल्याने आपले अनेक रोगांपासून बचाव होतो.

4.ब्लड सर्कुलेशन चांगले राहते(Blood Circulation remains Good):

गरम कोमट पाण्यात लिंबू टाकून पिल्याने ब्लड सर्कुलेशन चांगले राहते. गरम पाणी पिल्यामुळे काय होत तर आपल्या शरीरातील तापमान वाढते. शरीरातील तापमान वाढल्यामुळे घाम सुटतो घामावाटे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर निघून जातात.

लिंबू-पाणी-पिण्याचे-फायदे

5.केसांसाठी फायदेशीर( Good for Hair):

लिंबू पाणी पिण्याचे फायदे हे आपल्या केसांसाठी देखील आहे. गरम लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्या केसांची चमक चांगली राहते. केस चमकदार व मुलायम राहतात व केसांची ग्रोथ देखील चांगली राहते. गरम पाण्याच्या सेवनामुळे केसांची त्वचा डीहायड्रेट होण्यापासून वाचवते. म्हणजे केसांची त्वचा हि नेहमी हायड्रेट राहते व लवकर ड्राय होत होत नाही.

6.शरीराला व्हिटॅमिन सी मिळते(Body Gets Vitamin C)

रोज सकाळी उठल्यानंतर गरम कोमट पाण्यात निंबू टाकून पिल्याने आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. व आपली रोग प्रतिकारक शक्ती (Immunity Power)देखील वाढते.निंबू हा व्हिटॅमिन सी चा खूप चांगला स्रोत आहे. कोमट पाण्यात निंबू  टाकून पिल्याने आपल्या शरीरातील पी.एच स्तर नियंत्रित राहतो. Also read Vitamin C Benefits in Marathi

7.पचनक्रिया सुधारते(Improve Digestive System):

सकाळी उठून गरम पाण्यात निंबू आणि मध टाकून पिल्याने आपले पोट चांगले साफ होते. निंबू मध्ये ऍसिड असल्याने आपली पचनक्रिया चांगली राहते. मध हे आपल्या शरीरात अँटीबॅक्टेरियल चे काम करते. आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते.

7 गुणकारी लिंबू पाणी पिण्याचे फायदेतर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा …आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

Add Comment