मधुमेहाची 11 लक्षणे व घरगुती उपाय मराठीत- Madhumeh lakshne Gharuguti Upay in marathi

Infographic vector created by macrovector – www.freepik.com

Madhumeh lakshne gharuguti upay उतारवयात मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. शरीरात साखरेचे प्रमाण वाढले कि मधुमेह होतो. साखरेचा प्रतिकूल परिणाम व्हायला वेळ लागतो. म्हणूनच उतारवयात जास्त प्रमाणात मधुमेह झालेला दिसतो. त्याला शरीराच्या अनेक कार्यपद्धती जबाबदार असतात. वयोमानाने संथपणे त्याचा परिणाम होतो व उतारवयात तो जास्त प्रमाणात जाणवतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आज अनेक लोक इन्सुलिनची लस टोचून मधुमेहावर नियंत्रण ठेवत आहे. ते ठेवणे आवश्यक आहे. मधुमेहाबाबत अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत. त्याला घाबरून लोक राहतात.जीवनाच्या शेवटपर्यंत चालणाऱ्या विकारांपैकी मधुमेह हा प्रमुख विकार आहे. त्याला संपवणे डॉक्टरांच्या हातात नव्हे , तर विकारग्रस्तांच्या हातात असते. फक्त त्यांनी डॉक्टर जे सांगतात त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

दोन प्रकारचे मधुमेह – मधुमेह तारुण्यात किंवा बहुदा उतारवयातच होतो. ह्या दोन फरकात त्याचे होणे व त्याची कारणे वेगळीवेगळी असू शकतात. उतारवयात झालेला मधुमेह जास्त गंभीर असतो. तो काहीजण स्वतःच योग्य रीतीने हाताळतात. तर काही जण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतात. फारच थोड्या जणांना इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. पण तारुण्यात झालेला डायबेटीस जास्त गंभीर असतो. अशा आजाऱ्यांना इन्सुलिनवर जगावे लागते. त्यांना उपचारासाठी इन्सुलिनची आवश्यकता लागते. चला तर पाहूया Madhumeh lakshne gharguti upay

मधुमेह लक्षणे Madhumeh lakshne – Dibetes symptoms

Madhumeh-lakshne-gharguti-upay
Diabetic Vectors by Vecteezy

१. अत्यंत थकवा येणे.
२. ग्लानी येणे अशक्तपणा जाणवणे.
३. खूप घाम येणे.
४. मनात प्रचंड गोंधळ माजणे.
५. लघवी खूप होणे व वारंवार होणे.
६. तहान खूप लागणे.
७. जीभ सुकणे.
८. शरीराच्या सर्व अवयवांना मुंग्या येणे.
९. रक्तातील साखरेचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे ६० mg किंवा त्यापेक्षा कमी असणे
१०. ३०० mg किंवा त्यापेक्षा जास्त साखरेचे प्रमाण होणे.
११. उपचार न घेतलेल्या व्यक्तीला कधीही चक्कर येऊ शकते. किंवा तो बेशुद्ध पडू शकतो.

मधुमेह कशामुळे होतो ? – What causes diabetes

१. संपूर्ण शरिराला ऊर्जेची आवशक्यता असते. साखर (ग्लुकोज ) जाळून ती ऊर्जा संपूर्ण शरीराला पुरवली जाते. हि सर्व प्रक्रिया शरीरातील विविध भागांद्वारे केली जाते. सर्व मांसपेशी एकमेकांना लागून बळकट असतात. वयोमानानुसार त्यांच्यातील बळकटपणा कमी होऊ लागतो. सर्व शरीरातील प्रक्रिया मंदावते.

२. ग्लुकोज जाळण्याकरिता इन्सुलिनची आवशक्यता असते. शरीरातील मासांची बळकटता कमी झाल्यावर हे इन्सुलिन त्यातून मोकळे होते. त्यामुळे हव्या तेवढ्या प्रमाणात साखर (ग्लुकोज) जाळण्यासाठी इन्शुलिन मिळत नाही. त्यामुळे साखरेचा काही भाग जळत नाही. न जळालेल्या साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण रक्तात वाढते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील इतर प्रक्रियांना अडथळा येतो.

३. फॅट्स आलेले अन्न खाल्यामुळे मग अधिक त्रास होऊ लागतो. साधारणतः शरीरात साखरेचे प्रमाण १८० mg एवढे व त्यापेक्षा कमी असावे. माणूस किती प्रमाणात ग्लुकोज वापरतो. ते येथे महत्वाचे नाही. पण मधुमेहाच्या विकारात साखरेचे प्रमाण त्यापेक्षा जास्त वाढते.

४. जास्त करुन जेवण झाल्यानंतर साखरेचे प्रमाण वाढते. त्यानंतर ती मूत्राद्वारे बाहेर पडते. म्हणून साधारणतः युरिनमधून (मूत्र) बाहेर पडणारी साखर व रक्तातील साखरेचे प्रमाण सारखेच असते. म्हणजे त्याचे परीक्षण करुन डायबेटिज (मधुमेह) आटोक्यात आणता येतो.

५. पण ह्याला काहीजण अपवादहि असतात. त्याच्यांत उरिनमध्ये साखरेचे प्रमाण रक्तात जर १८० mg पेक्षा जास्त नसेल तर साखर घेतच नाही, म्हणून त्यांच्या रक्ताचे परीक्षण करावे लागते.

मधुमेह घरगुती उपाय – Home Remedies for Diebetic

१. Madhumeh lakshne gharguti upay जास्त साखर खाल्याने शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. व मधुमेह होतो. म्हणून जास्त गोड पदार्थ खाताना संयम ठेवा. शरीराला आवश्यक तेवढीच साखर पोटात गेली पाहिजे. शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू नये. ह्याकडे लक्ष दिले पाहिजे.रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी हे करावेच लागते.

२. कच्ची साखर व साखरेपासून बनविलेले गोड पदार्थ, तसेच मादक पेये ह्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. कारण त्या पदार्थमुळे किंवा मादक पेयांमुळे हृदयक्रिया (ठस ठस ) जोरात होऊन रक्तप्रवाह जोरात होतो. तसेच जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ गव्हाचे पीठ बटाटे ह्यांच्यामुळे हृदयक्रिया संथ होते. त्यामुळे ताज्या भाज्या खाल्याने हृदयक्रिया संथ रीतीने चालत राहते.

३. साखर जास्त खाऊ नये. तसेच भातातही कार्बोहायड्रेटसचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो कमी खावा किंवा खाऊ नये. त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. शरीर चांगले राहण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ जीवनसत्व मिळवण्यासाठी भाज्या खाव्यात. शरीरात फॅट्स वाढवणारे पदार्थ ( लोणी ,तूप , अंडी ) खाऊ नयेत किंवा अत्यंत कमी प्रमाणात खावेत. अत्यंत गोड असणारे म्हणजे आंबे व द्राक्षासारखी फळे कमी प्रमाणात खावीत किंवा न खाणे उत्तम.

४. केवळ सध्या जेवनाद्वारे जर मधुमेह आटोक्यात येत नसेल तर मात्र औषधेही घ्यायला हवीत. त्याचे डोस डॉकटरानी सांगितल्याप्रमाणेच घ्यावेत. जास्त कमी घेतल्याने अपाय होऊ शकतो. डोस डॉक्टर सांगतील तेवढाच घेतला पाहिजे. काही डोस दीर्घकाळासाठी असतात. ह्याबाबत डॉक्टर कमी डोस देऊन सुरवात करतात. व हळूहळू तो वाढवून रोगी बरा होईपर्यंत तो तसाच ठेवतात.

५. ह्यावरून लक्षात आले असेल की साखरेचे प्रमाण जास्त व कमी होऊनही चालत नाही त्यामळे आजाऱ्याने आपल्या जेवणाची वेळ व सवय कधीच मोडता काम नये. जेवणात अनेक पदार्थ जर असले तर फॅट्स वाढविणारे पदार्थ त्याने वर्ज्य केले पाहिजेत. हाच नियम ‘ इन्सुलिनचे इंजेक्शन ‘ घेतल्यानंतरही कठोरपणे पाळावा. Also read बालवयातील लठ्ठपणा – एक नवी आरोग्य समस्या

६. जर मधुमेही आजारी पडला किंवा त्याला ताप आला किंवा जखम झाली किंवा दुसऱ्या आजाराचा त्रास होऊ लागला, तर लगेच डॉक्टरांना कळविलेच पाहिजे. ते इन्सुलिनचे प्रमाण वाढवतील किंवा कमीही करु शकतील.

७. साखर (ग्लुकोज) जाळण्यासाठी व्यायाम उपयोग ठरतो. म्हणून इन्सुलिनची मदत कमी करण्यासाठी आपण व्यायाम करायला हवा. आपण व्यायाम नियमित केला पाहिजे. जेवणाचे, इन्सुलिनचे नियम जसे कठोरपणे पाळायला हवेत, तसेच व्यायामही काटेकोरपणे नियमितपणे करायलाच हवा. व्यायामुळे लठ्ठपणा व वजन कमी होण्यास मदत होते . म्हणजे त्या अनुषंगाने मधुमेह ही कमी होत जातो.

८. मधुमेहांनी मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले पाहिजे. वेळोवेळी रक्त व लघवीची तपासणी केली पाहिजे . पण त्याबरोबरच डॉक्टरांकडेही वेळोवेळी जाऊन आपल्या सुधारणेबाबत विचारपुस केली पाहिजे .

मधुमेहाची 11 लक्षणे व घरगुती उपाय मराठीत- Madhumeh lakshne Gharuguti Upay in marathi – माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

Add Comment