लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय व परिणाम कोणते – Obesity information marathi

Love photo created by jcomp – www.freepik.com

लठ्ठपणा – Obesity information marathi

obesity information marathi – भारतातील श्रीमंत वर्गात लठ्ठपणाची समस्या अनेकांना दुखावत आहे. लठ्ठपणाची चिकित्सा करणे सोपे आहे. त्यासाठी एक तिरका कटाक्ष टाकला तरी एखाद्याची लठ्ठपणाची चिकित्सा करता येते. लठ्ठपणा म्हणजे रोगांना आमंत्रण आहे. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक रोग फैलावू शकतात. त्यातील काही अति गंभीर असू शकतात. जास्त करुन वृद्ध लठ्ठ वक्तींमध्ये ह्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे होणारे विकार १. डायबेटिस २. रक्तदाब ३. हृदयविकार ४. झटके व पॅरेलेसीस ५. पायातील स्नायू, नाड्या, गुडघे दुखणे ६. संधिवाताचे दुखणे. 

लठ्ठपणाचे परीणाम व कारणे – Obesity causes and Effects in marathi

१. लठ्ठ माणसाला आपल्या जास्तीच्या वजनाचा बोजा नेहमी सांभाळावा लागतो. एखादी खूप वजनाची बॅग घेऊन जाण्यासारखे हे असते.

२. रोजच्या नेहमीच्या जीवनात त्यांना एवढा बोजा उचलावा लागतो. त्यामुळे गुढघेदुखी व सांधेदुखी सुरु होते. शरीरात जी हाडे एकमेकांना जोडलेली असतात त्यांना त्रास व्हयला लागतो. जास्तीचे वजन वेदनांचे कारण बानू शकते.

३. जास्तीचे वजन हृदय, फुफुस ह्यांच्यावर त्रास व्हायला लागतो. श्वाशोच्वास कमी झाल्याने माणूस सुस्त, मंद बनतो. नंतर सुस्तपणामुळे माणसाचे वजन अधिक वाढू लागते. अशाप्रकारे एक वर्तुळच तयार होते.

४. obesity information marathi – अपचनामुळे व विविध कारणामुळे चरबी वाढते. त्यामुळे माणूस अधिक लठ्ठ बनतो. अति चरबीमुळे शरीरातील नाड्यांना त्रास व्हायला लागतो. त्या काही ठिकाणी अडथळतात.

५. विशेष करुन जास्त चरबी वाढल्याने हृदय, फुफुस, किडनी ह्या महत्वाच्या अवयवांच्या आजूबाजूंच्या नाडयांना, नसांना रक्तपुरवठयात अडथळा यायला लागतो. तेव्हा हृदयाचा झटका, पॅरेलेसीस, रक्तदाब असे भयानक विकार होऊ शकतात.

६. तुम्ही किती खाता व किती कष्ट करता ह्यावर तुमचे शरीराचे वजन आधारित आहे. तुम्ही जर कमी खाल्ले व जास्त मेहनत केली तर तुमचे वजन कमी होईल.

७. तसेच जर कमी खाल्ले व जास्त मेहनत केली तर तुमचे वजन कमी होईल. तसेच जर तुम्ही भरपूर खाल्ले व मेहनत कमी केली तर तुमचे वजन वाढेल. शरीरातील जास्त कॅलरीचे रुपांतर तुमच्या लठ्ठपणात होईल. वर्षनुवर्षे असे चालल्यावर तुम्ही जास्त लठ्ठ होत जाता.

८. obesity information marathi – जास्त प्रमाणात तूप, लोणी, वनस्पती तेलात तळलेले पदार्थ खाल्याने लठ्ठपणा येतो. हेच नव्हे तर गोड पदार्थ, साखर, भात, पोळ्या, बटाटे, ह्या गोष्टींमुळेही लठ्ठपणा वाढू शकतो. शरीरातील न वापरलेली ऊर्जा किंवा शक्तीचे रुपांतर लठ्ठपणात होते.

९. लठ्ठपणाचे सर्वात जास्त मोठे कारण आहे आपल्या जेवणात येणारे तळकट पदार्थ, पराठे व पुऱ्या हे होय. ह्या पदार्थमुळे आपण जास्त लठ्ठ होतो. तसेच जास्त जेवल्यानेही लठ्ठपणा वाढतो.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय – Home Remedies for Obesity

obesity information marathi
Background photo created by jcomp – www.freepik.com

१. आपल्या जेवणात पुरेसे प्रोटीन असलेले, पण चरबी न वाढवणारे पदार्थ असावेत.
२. ज्या पदार्थांमुळे शरीरातील ऊर्जा कॅलरी वाढते ते कमी करावेत किंवा खाऊच नयेत.
३. तळकट पदार्थ पूर्णपणे बंद केले पाहिजेत. obesity information marathi
४. डाळी, दूध व अंडी तसेच मासे मांसाहारी लोकांना केवळ प्रोटीन पुरवण्यासाठी पुरेसे आहेत
५. ताजा भाजीपाला, तसेच फळे खा. अतिगोड म्हणजे साखरेचे प्रमाण वाढविणारी फळे खाऊ नका.
६. जेवण करण्याआधी पाणी किंवा लस्सी प्या. त्यामुळे तुमचे अर्धे पोट तेव्हाच भरुन जाईल. अर्धे पोट भरल्यामुळे तुम्ही कमी खाल.
७. ह्यास साहाय्य म्हणून आपल्या जेवणातील पोळी किंवा भात हे जेवणात नेहमी असलेले पदार्थ थोड्याफार प्रमाणात खावेत.
८. आपले जेवण कमी करण्याचे ध्येय साध्य झाल्यावर उंची व वजनाचे परिणाम बरोबर झाल्यावर आपले हे असे कमी जेवणे बंद केले पाहिजे. पण व्यायाम करणे सोडू नका.
९. obesity information marathi – उपास उपास करणे हा देखील पूर्वीच्याकाळी चालणार चांगला उपाय आहे. पण एक दिवस उपास केल्यानंतर दुसऱ्यादिवशी भरपूर जेवून त्याची कसर काढून घेऊ नये. तसे केल्यास आपल्या उपासाला काहीच अर्थ राहणार नाही.
१०. डायटिंग करताना शरीराला जीवनसत्व मिळालीच पाहिजेत. जेवणात केवळ जीवनसत्त्वांचे जेवण करणे अवघड आहे. म्हणून बाजारात मिळणाऱ्या जीवनसत्व वाढविणाऱ्या गोळ्या घेऊन डायटिंग चांगल्यारीतीने करता येते.
११. केवळ एक गोळी किंवा कॅप्सूल दिवसासाठी पुरेशी ठरते. लठ्ठपणा एकदम कमी होत नाही. हे नेहमी लक्षात ठेवावे आपण प्रयत्न केल्यानंतर तो हळूहळू कमी होत जातो.
१२. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आतापर्यंत कुठले औषध उपयोगी पडलेले नाही. ह्यावर एकच रामबाण उपाय म्हणजे कमी खाणे व जास्त काम करणे हाच आहे. काम म्हणजे शारीरिक क्रिया व व्यायाम. Also read बालवयातील लठ्ठपणा – एक नवी आरोग्य समस्या

महिन्याला किती प्रमाणात वजन कमी करण्याचे धेय्य ठेवावे ? – obesity information marathi
आपण दर महिन्याला १ किलो वजन दर महिन्याला कमी करण्याचे ठरविले तर ते योग्य होईल. त्यात तुम्हाला काहीच कठीणाई येणार नाही. पण जर तुम्ही अतिलठ्ठ असाल, तर महिन्याला कमीत कमी २ किलो वजन कमी करण्याचे ठरविले पाहिजे. अशा रीतीने १० ते २० किलो वजन कमी होऊ शकेल.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय व परिणाम कोणते – Obesity information marathiमाहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!
      

Add Comment