8 आरोग्यदायी अननस फळाचे फायदे मराठीत जाणून घ्या

अननस-फळाचे-फायदे-मराठीत

अननस फळाचे फायदे मराठीत जाणून घ्या. अननस हे एक खूप लोकप्रिय फळ आहे जे खाण्यासाठी जेवढं चविष्ट आहे तेवढेच  त्याचे फायदे पण आहे. अननस ह्या फळाची सुरवात दक्षिण अमेरिकेत झाली. त्यात खूप पोषकद्रव्ये  अँटिऑक्सिडेन्ट फायबर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, कॉपर , थायमिन , नियासिन , रायबोफ्लॅविन, आयरन , मॅग्नेशियम, पोटॅशियम  मुबलक प्रमाणात आढळतात .हे सर्व उपयुक्त व्हिटॅमिन्स आहेत  जे आपल्या शरीरात असणाऱ्या रोगांशी लढण्यास मदत करतात. चला तर बघूया

अननस (Pineapple)हे ब्राझील ह्या देशाचे फळ आहे. प्रसिद्ध नाविक क्रिस्तोफर कोलंबस आपल्या सोबत अननस हे फळ यूरोप मधून घेऊन आला होता . आपल्या भारतात हे फळ पोर्तुगीज घेऊन आले. आपल्या इकडे सर्वात जास्त अननस ह्या फळाचे उत्पादन दक्षिण भारतात केले जाते.

वैज्ञानिक नाव: अनानस कोमजस ( Ananas comosus)
इंग्रजी नाव: पाईनऍपल (Pineapple)

अननस फळाचे फायदे – Pineapple Fruit Benefits

1.हाडे मजबूत( Good For Healthy Bones):

जर तुम्हाला तुमची हाडे दीर्घकाळ मजबूत करायची असतील तर तुम्ही  तुमच्या आहारात अननसाचा समावेश करा ह्यात मॅगनीज हे व्हिटॅमिन्स असल्यामुळे आपली हाडे मजबूत करण्यास मदत करतात . तसेच ब्रोमेलेचे अँटिइन्फ्लेट्ररी तत्व अर्थराइटिस सारख्या समस्या दूर करण्याचे काम करते.

2.सर्दी आणि खोकला(Healthy For Cold and Cough): 

जेव्हा म्युकस मध्ये कोणत्याही प्रकारची सूज येते तेव्हा नाक गोठण्यास सुरवात होते. अननसमध्ये अँटीइंफ्लेमेट्री गुणधर्म असतात. ज्यामुळे ह्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते आपल्याला जर अशी समस्या असल्यास अननसाचे नियमित सेवन केल्याने आपल्याला अराम मिळतो.

3.तोंडाचे आरोग्य( Good For Oral Health):

अननस आपल्या तोंडचे आरोग्य राखण्यास देखील मदत करते. ह्यात व्हिटॅमिन सी असल्यामुळे दातातील प्लाकची समस्या टाळण्यास मदत होते . तसेच हिरड्यांच्या समस्येवर देखील फायदेशीर आहे. अननसमध्ये ब्रोमेलिन असते. जे दात चमकावणे व पांढरेपणा राखण्यास मदत करते.

4.वजन कमी करणे(Good For Weight loosing):

अननस हे फळ आपल्याला वजन कमी करण्यास देखील मदत करते. अननस खाल्याने आपले पोट बऱ्याच वेळेपर्यंत भरलेले राहील ज्यामुळे आपल्याला  इतर काही खाण्याची इच्छा होणार नाही व या कारणामुळे आपल्याला आपले वजन कमी करण्यास मदत होईल.

Photo by Karolina Grabowska from Pexels

5.रोगप्रतिकारक शक्ती(Immunity Booster):

अननस हे फळ खाल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ह्यात व्हिटॅमिन्स सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे सर्दी व इतर अनेक रोग बरे करण्यास  मदत होते. अननस हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे

6.कॅन्सर(Healthy For Cancer Pations):

अननस ह्या फळात अँटिऑक्सिडेन्ट व ब्रोमोलिन व्हिटॅमिन्स असल्यामुळे जे आपल्या शरीरातील मुक्त कणांशी (फ्री रॅडिकल्स )लढायला मदत करतात व पेशींचे नुकसान न होण्यास मदत करतात व तसेच कर्करोगाच्या अनेक  प्रकारच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

7.पचनक्रिया(Improve Digestive System):

अननस हे फळ आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते ह्यात व्हिटॅमिन सी आणि फायबर चे प्रमाण असल्यामुळे आपली पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करतात .अननसाच्या  नियमित सेवनानाने आपल्याला आपल्या शरीरात जाणवणारा आळशीपणा व अपचन या दोन्ही समस्यांवर मात करता येते.

8.त्वचेसाठी लाभदायी(Healthy For Skin):

अननसमध्ये अँटिऑक्सिडेन्ट आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते . अननस फळाचे फायदे मुळे अँटिऑक्सिडेन्ट चेहऱ्यावरील सुरकुत्यानपासून दूर ठेवते. आणि व्हिटॅमिन सी मुळे त्वचेवर ग्लो येतो आणि त्वचा निरोगी राहते.

अननसात असणारे आवश्यक घटक – Essential ingredients in Pineapple

पोषकतत्वे (Nutritions)जीवनसत्व(Vitamin)खनिजे(Minerals)
प्रोटीन :  ०.५४ ग्रॅमव्हिटॅमिन  सी : ६४%मॅगनीज : ५२%
फॅट : ०. २ ग्रॅमव्हिटॅमिन बी ६: ९%कॉपर: १२%
कार्बोहैड्रेट : १३. १२ ग्रॅमव्हिटॅमिन बी १: ६%
फायबर : १. ४ ग्रॅम
शुगर: ९. ८५ ग्रॅम
कॅलरीज :५०. ० ग्रॅम

अननस फळाचे फायदे मराठीत जाणून घ्या

माहिती मित्रांनो कशी वाटली Comments करून सांगा व आवडल्यास नक्की Share....करा…!!!

आपल्या आरोग्याची काळजी घ्या …. घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

Related:
किवी फळ फायदे
क जीवनसत्व

Add Comment