Pomegranate 6 Healthy Benefits in Marathi – डाळींब फळाचे फायदे आणि घरगुती उपाय

Pomegranate हे फळ खायला खूप चवदार आहे. तसेच त्यात अनेक प्रकारचे पोषकतत्वे आहे. ह्यात लोह, थायमिन, रायबोफ्लॅविन, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए , सी, ई , के भरपूर प्रमाणात आहे . डाळींब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. त्याला सोला त्यातील दाणे खा. हे जरी कंटाळवाणे असले तरी डाळींब हे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. चला तर बघूया Pomegranate 6 Healthy Benefits in Marathi

डाळींब (Pomegranate) फळाला आयुर्वेदात खूप जास्त महत्व दिल गेलं आहे. डाळींब  चे पीक हे भारतात तसेच बाहेरील देशात देखील घेतले जाते जसे कि इराण, तुर्की, स्पेन , मोरोक्को , अफगाणिस्तान  हे डाळींब चे उत्पादन करणारे प्रमुख देश आहेत.

शास्त्रीय नाव(Scientific Name) : पुनिका ग्रॅनाटम (Punica granatum)
इंग्रजी नाव: पॉमेग्रॅनेट (Pomegranate)

Pomegranate Fruit Benefits – डाळींब फळाचे फायदे

 1. त्वचेसाठी लाभदायी (Healthy for Skin) :

Pomegranate आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे . कारण  ह्यात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेन्ट चे प्रमाण भरपूर आहे . ह्या फळाचे नियमित सेवन केल्याने आपली त्वचा मऊ होते व सुरकुत्या कमी होतात तसेच चेहरा चमकदार होतो व आपल्या  चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास  मदत होते . 

2. कॅन्सर रोगावर फायदेशीर (Helathy for Cancer) :

डाळींब फळाचे रोज सेवन केल्याने डाळींब मुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये नाहीसे होण्यास मदत होते व त्यामुळे कॅन्सर सारख्या प्राणघातक रोगाचा विकास होणे थांबतो . ह्या फळात अँटिऑक्सिडेन्ट हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या शरीरातील विषारी द्रव्यांना बाहेर टाकतात व आपल्या पांढऱ्या पेशी मजबूत करतात . Pomegranate चे दररोज सेवन केल्याने कॅन्सर सारख्या होणाऱ्या रोगापासून बचाव होतो स्त्रियांमध्ये होणाऱ्या स्तन(Breast) कॅन्सरसाठी हे  फळ अधिक फायदेशीर आहे.

3. गरोदर महिलांसाठी (Helathy for Pregnanate Women) :

डाळींब हे त्या स्त्रियांसाठी फायदेशीर आहे ज्या गरोदर आहेत. हे फळ गर्भशयातील  रक्त प्रवाह सुरळीत करण्यास मदत करते आणि गर्भपात होण्याची समस्या कमी होते . एका अभ्य्सात केलेल्या रिसर्च नुसार असे लक्षात येते की Pomegranate हे आपल्या शरीरातील प्रजनन अवयवांना स्वस्थ ठेवतात. आणि गर्भधारणा सुरळीत होण्यास मदत  करतात . डाळींब मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के सोबत फॉलिक ऍसिड आहे जे गर्भशयातील बाळाचा विकास करण्यास मदत करतात .तसेच आपल्या शरीरातील ताण तणाव हि दूर करतात.

4. ऍनिमिया रोगावर फायदेशीर (Healthy for Anemiya Diseases) :

ज्या व्यक्तींना ऍनिमिया आहे त्यांना तर हे फळ  खूप लाभदायी आहे . हे फळ खाल्याने आपल्या शरीरातील लोह आणि लाल रक्त पेशी वाढवण्यास मदत होते. तसेच आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन ची मात्रा देखील वाढते. ऍनिमिया असणाऱ्या व्यक्तींसाठी हे एक डायट्री सप्लिमेंट सारखं काम करत. त्यासाठी ऍनिमिया असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारात Pomegranate फळाचा समावेश करणे फायदेशीर ठरेल . 

5. उच्च रक्तदाब (Goog for Blood Pressure):

डाळींब हे अँटिऑक्सिडेन्ट,  व्हिटॅमिन सी आणि नायट्रिक ऑक्साईड ह्यांचा चांगला स्रोत आहे . ह्यात असणाऱ्या पोषकतत्वांमुळे आपल्या शरीरातील  रक्तप्रवाह आणि रक्तधमन्या पोषित होतात  रोज एक ग्लास डाळींब फळाचा ज्युस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते .

 6. स्मरणशक्ती वाढते (Memory increases) :

डाळींब फळाचे नियमित सेवनाने समरणशक्ती देखील वाढते . तसेच ज्यांना विसरण्याची बिमारी आहे त्या सारख्या रोगांना हरवण्याची क्षमता देखील ह्या फळात आहे. असे एका अभ्य्सात केलेल्या निष्कर्षानुसार लक्षात आले आहे.

Pomegranate Essential Ingredientsडाळींब फळ असणारे आवश्यक घटक

पोषकतत्वे(Nutritive)जीवनसत्व(Vitamins)खनिजे(Minerals)
प्रोटीन : १. ६७ग्रॅम व्हिटॅमिन सी :१४%, मँगनीज : ७%,
फॅट : १. १७ ग्रॅमव्हिटॅमिन बी १: ५%कॉपर : १८%
कार्बोहैड्रेएट्स : १८. ७ग्रॅमव्हिटॅमिन बी ५: ८%पोटॅशियम: ७%
कॅलरीज : ८३. ० ग्रॅमफोलेट : १०%फॉसफरस : ५%
शुगर : १३. ६७ ग्रॅमव्हिटॅमिन बी : ६: ६%
फायबर : ४.० ग्रॅम

    

Pomegranate Home Remedies – डाळींब घरगुती उपाय

१. Pomegranate (डाळींब) फळाच्या पानाचा चहा करून पिल्यास आपल्या पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.
२. डाळींब फळाची पेस्ट व दही हे एकत्रित करून केसाला लावल्यास आपले केस गळणे थांबते व केस मऊ होतात.
३. डाळींब फळाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते.
४. खोकला येत असेल तर डाळींब फळाची साल बारीक करुन पाण्यासोबत घेतली तर खोकला कमी होतो.
५. ताप आल्यावर काहीजणांना सारखी सारखी तहान लागते गळा सुकून जातो. त्यावेळेस Pomegranateडाळिंबाचा रस पिणे खूप फायदेशीर आहे.
६. खोकला येत असेल तर खोकल्यावर एक घरगुती उपाय म्हणून Pomegranateडाळिंबाची साल चोखल्यास खोकला लवकर बसण्यास मदत होईल.

Related:
Watermelon 5 Healthy Benefits in Marathi
केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Pomegranate 6 Healthy Benefits in Marathi – माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा….!!!

आपल्या आरोग्याची काळजी घ्या …. घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!! 

 

13 Comments

 1. https://ketovibepills.com/ September 21, 2020
 2. http://fineskinserum.org/ September 21, 2020
 3. Pure Dietary Keto Review September 22, 2020
 4. Ezekiel September 22, 2020
 5. Ryan September 28, 2020
 6. shop.shangnuolighting.com October 13, 2020
 7. shangnuo lighting October 13, 2020
 8. Stepanie April 18, 2021
 9. Lesli May 15, 2021
 10. mega bulb pendant sr2 July 1, 2021

Add Comment