पोटातील जंतासाठी घरगुती उपाय व लक्षणे कारणे बघूया. पोटातील जंताचे अनेक प्रकार आहेत. गोल जंत, आकडी जंत,चपटे जंत, असे जंताचे प्रकार आपल्या भारतात सर्व ठिकाणी आढळतात. गोल जंत सर्वात मोठे १५ ते २४ सेंटीमीटर लांबीचे असतात. रंगाने फिकट पिवळसर असतात. साधरणतः लहान मुलांच्या पोटातच आढळतात. आकडी जंत एक सेंटीमीटर लांबीचे असतात. लहान असतात. आतडयांना चिकटून लटकून राहतात. आणि रक्त शोषतात. टाचणीसारखे दिसणारे हे जंत ६.३५ सेंटिमीर लांबीचे असतात.
लहान मुलांच्या शौचातून दोरासारखे जंत पडताना दिसतात या जंतांची मादी १ सेंटीमीटर लांबीची असते. चपट्या जंताचे एकंदर तीस प्रकार पडतात. यातील काही जंत एक-दोन इंच लांबीचे असतात. तर काही जंत दहा ते तीस फूट लांबीचे असतात.
उष्ण कटिबंधातील देशातील माणसात पोटातील जंत सर्वसामान्यतः असतातच. तोंडावाटे किंवा पायाच्या त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये जंताचे प्रकार प्रमाण जास्त आढळते.
पोटातील जंत लक्षणे – Symptoms of stomach worms
१.पोटातील जंत असतील तर जुलाब होतात. तोंडाला वास येतो.
२.डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येतात.
३. रात्री अस्वस्थ झोप लागते.
४. भूक लागण्याचे प्रमाण वाढणे.
५. रात्री झोपेत वाईट स्वप्न पडतात.
६. डोके दुखु लागणे.
७. डोकेदुखी मुळे मुलं सतत चीड चीड करू लागतात.
८. साध्या साध्या कारणांवरुन रागवतात.
९. गोल जंतांमुळे आतडयांना व फुफुसांना सूज येते.
१०. मळमळ, उलटी, वजन कमी होणे, ताप येणे अशी लक्षणे दिसू लागतात.
११.आकडी जंतामुळे मुले फिकट आणि अशक्त दिसू लागतात.
१२. कुपोषणाची लक्षणे दिसु लागतात.
१३. दोर जंत असतील तर गुद्द्वारला खाज सुटते.
१४. चपट्या आणि गोल जंतामुळे लहान मुलांना झटके येतात.
१५. दोर जंतामुळे जुलाब, बद्धकोष्ठ, गुदद्वाराला खाज येणे, वजन कमी होणे, ताप खोकला येतो.
पोटातील जंत कारणे -Causes of stomach worms
१.अर्धवट शिजवलेले मांसाहारी अन्न खाणे.
२.पाण्यामधून जंतांची अंडी माणसांच्या शरीरात प्रवेश करतात.
३.गोल जंत दूषित अन्नातून पोटात जातात.
४.लहान मुलं मातीत खेळतात. या मातीत जंतांची अंडी असतात. ती नखांमध्ये जाऊन बसतात. त्याच हाताने जेवल्याने जंतांची अंडी पोटात जातात.
५.ज्या शेतात माणसाचा मैला खत म्हणून वापरतात. तिथल्या भाज्यांमध्ये जंतांची अंडी असण्याची शक्यता असते. म्हणून शिजवण्यापूर्वी भाज्या स्वच्छ धुऊन घेणे आवश्यक आहे.
६. अंडयांना अन्न आणि पाणी यांच्यातून शरीरात प्रवेश मिळतो हे नेहमी लक्षात ठेवावे.
पोटातील जंतासाठी घरगुती उपाय – Home remedies for stomach worms
१.जंतावर आता अनेक प्रकारची औषधे निघाली आहे. त्यांनी तात्पुरता फरक पडतो पण त्यामुळे पचनसंस्थेवर त्याचें वाईट परिणाम पडतात.त्यापेक्षा पोटातील जंतासाठी घरगुती उपाय नैसर्गिक उपचार करणे कधीही चांगले.
२.पोटातील जंतासाठी घरगुती उपाय म्हणून नारळ हे सर्वांत प्रभावी औषध आहे. नारळाने जंत पडतात. खोबऱ्याचा एक चमचा किस सकाळी दयावा. त्यांनतर १५ ते २० मिलिलिटर ऍरेंडेल तेल कपभर कोमट दुधात दयावे. जंत पडेपर्यंत असे नेहमी देत राहावे. त्यामुळे जंतांचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
३. दोर जंत पाडण्यासाठी गाजर चांगले आहे पोटातील जंतासाठी घरगुती उपाय म्हणून वाटी भरून गाजराचा किस रोज सकाळी खायला दयावा. गाजर खायला दिल्यावर दुसरे काहीही खायला देऊ नये. गाजर खाल्याने सगळे जंत पडतात.
४.पोटातील जंतासाठी घरगुती उपाय लसूण हे जंतांवरचे पारंपरिक औषध आहे. लसणीच्या एक दोन पाकळ्यांचा रस फळांच्या रसात किंवा भाज्यांच्या सूप मधून दयावा. लहान मुलांना काहीही त्रास न होता पोटातील जंत मरुन जातात.
५.गोल जंत पडण्यासाठी कच्या पपईचे एक चमचा दुध,दोन चमचे मध, गरम पाण्यात मिसळून दयावे . हा घरगुती उपाय सात ते दहा वर्षाच्या मुलांसाठी आहे. Also Read पपई खाण्याचे फायदे व घरगुती उपाय
६.जंतांच्या उपचाराची सुरवात आहारापासून होते. जंत झालेल्या मुलांना पहिले दोन दिवस फक्त ताजी फळे दयावी. पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस टाकून त्याचा एनिमा दयावा. त्यामुळे जंत पडतात. लहान मुलांचे अंथरून रोज उन्हाळ्यात वाळत घालावे. मुलांची खोली स्वछ प्रकाशाने आणि खेळत्या हवेने युक्त असेल याची काळजी घ्यावी.
७.दोन दिवस फळांचा आहार दिल्यानंतर कच्ची कोशिंबिरी आणि शिजवलेले भाज्या दयावा. दोन तीन दिवस झाल्यानंतर नेहमीच आहार चालू करावा. तेलकट तुपाचे मांसाहारी पदार्थ देऊ नये. सगळे जंत पडेपर्यंत असा आहार चालू ठेवावा. तसेच पोटावर मातीचा लेप किंवा थंड पाण्याचा दाब देणे असेही घरगुती उपचार करणे फायदेशीर ठरू शकतात.
पोटातील जंतासाठी घरगुती उपाय लक्षणे कारणे – माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!