जाणून घ्या – सर्दी साठी घरगुती उपाय कोणते व सर्दी होण्याची कारणे आणि लक्षणे कोणती

Education vector created by brgfx – www.freepik.com

सर्दी साठी घरगुती उपाय कोणते – सर्वसाधारण कोरायझा हा स्वशनलिकेचा वरच्या भागात होणारा रोग आहे. हा रोग विषाणू किंवा व्हायरसमुळे होतो. इतर रोगांच्या मानाने लहान मुलांना हा जास्त प्रमाणात होतो. सर्दी तीन किंवा सात दिवस राहते. सर्दीमुळे रुग्णांची अवस्था अत्यंत केविलवाणी होते. 

शाळेच्या मैदानात खेळणाऱ्या मुलांना किंवा गर्दीमधील माणसांना सर्दी लवकर होते. प्रत्येक मुलाला सरासरी प्रत्येक वर्षात पाच वेळा सर्दी होते. वाढत्या वयाचा हा एक महत्वाचा भाग आहे. वारंवार सर्दी झाल्याने शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. 

सर्दीवर अजूनही रामबाण उपाय नाही. ऍस्पिरिन, कोडीन वगैरे घेतल्याने तेवढयापुरती सर्दी कमी होते. पण नंतर त्याचे दुष्परिणाम होतात. सर्दी झाल्यावर कोणतेही औषध काम करत नाही. “औषधाने सर्दी एका आठवड्यात बरी होते. औषध न घेता सात दिवसात जाते !” हे वाक्य तर प्रसिद्धच आहे

सर्दी होण्याची लक्षणे – Common Cold Symptoms

१. सर्दीचे पहिले लक्षण म्हणजे घसा आणि नाक भरल्यासारखे वाटते.
२. हा रोग नाक आणि घसा यांचा असला तरी त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो.
३. सतत नाक वाहणे, शिंका येणे, ताप येणे, डोके दुखणे, घसा धरणे. थंडी वाजून येणे.
४.अंग दुखणे, भूक मंदावणे, हि सर्दीची सामान्य लक्षणे आहेत. सर्दीमध्ये नाक हुळहुळे होते.
५. लहान तहान्या बाळाचे नाक चोंदले असेल तर त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. त्याला स्तनपान नीट करता येत नाही.
६. सहाव्या महिन्यात सर्दीचे प्रमाण कमी होते. मोठ्या मुलांना वारंवार सर्दी होते. सर्दीमधे ताप सुद्धा येतो.
७. ऍलर्जी मुळे सुद्धा सर्दी होते. यांत शिंका सतत येतात. नाक सारखे वाहत असते.
८. हिवाळयात वाऱ्यामुळे धूळ नाकात गेल्यामुळे या सर्दीला सुरवात होते. काही वेळा वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी होते.

सर्दी होण्याची कारणे – Common Cold Causes

१. विषाणू (व्हायरस) आणि जिवाणू (बॅक्टेरिया) यांच्यामुळे सर्दी होते परंतु बद्धकोष्टामुळे शरीरामध्ये विषारी पदार्थ साचतात आणि त्यावर हे जंतू वाढतात. म्हणून अयोग्य पध्दतीचा आहार मुलांना देणे हे सर्दीचे मूळ कारण आहे.
२. पाव, पुडिंग, केक यांसारखे मैद्याचे पदार्थ तसेच जाम चॉकलेट यांसारखे गोड खाणे दिल्याने मुलांच्या शरीरात जंतू वाढायला मदत होते.
३. मुलांना सर्दी होण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांना वाजवीपेक्षा जास्त कपडे घालणे. ते मुलांच्या आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे त्वचेला नैसर्गिक पने काम करायला मोकळीक मिळत नाही. म्हणून सर्दी आणि छातीचे विकार होतात.
४. लहान मुलांना आतले कपडे लोकरीचे कधीच घालवू नयेत. सूक्ष्म छिद्र असलेले सुती कपडे घालावे.

सर्दी साठी घरगुती उपाय कोणते – Common Cold Home Remedies

१. सर्दी साठी घरगुती उपाय योग्य आहार दिला तर सर्दीला आळा बसतो. सर्दी झाली असेल तर पहिल्या दिवशी मुलाला संत्रे किंवा अननसाचा रस दयावा. कोमट पाण्याचा एनिमा देऊन पोट साफ करावे. नंतर आणखी दोन दिवस फक्त फळे दयावी सर्दी मध्ये भूक लागत नाही. म्हणून जबरदस्तीने खायला घालू नये. दूध आणि दुधाचे पदार्थ देऊ नये. बार्ली वॉटर किंवा शहाळ्याचे पाणी किंवा साधे पाणी दयावे.

२. गरम पाण्यात मध टाकून दयावा. त्यामुळे खोकला आणि शिंका बंद होतात. कफ वाढेल असा आहार देऊ नये. केक, पेस्टरी , चॉकलेट, मैदा साखरयांचे पदार्थ देऊ नयेत.

३. सर्दी साठी घरगुती उपाय म्हणून लिंबू हा सर्दीवरचा उत्तम घरगुती उपाय आहे. सर्दी आणि टॅप यांवर ते एक चांगले औषध आहे. लिंबाच्या रसात क जीवनसत्व असल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. शरीरातील घातक पदार्थ नष्ट होतात. आणि सर्दी लवकर बरी होते. ग्लास भर पाण्यात अर्धे लिंबू पिळावे. त्यात एक चमचा मध घालावा. सहा महिन्याच्या आतील मुलांसाठी याचा अर्धा ग्लास पुरेसा आहे. Also Read -7 गुणकारी लिंबू पाणी पिण्याचे फायदे

सर्दीसाठी-घरगुती-उपाय-कोणते-व-कारणे-आणि-लक्षणे-कोणती
Photo by Lukas from Pexels

४. सर्दीवर सर्दी साठी घरगुती उपाय फार पूर्वीपासून वापरतात. लसूण वेदनाशामक आहे लसूण तेलामुळे श्वसनलिकांमधील कफ मोकळा होतो. शरीरातील घातक पदार्थांचा नाश होतो. आणि ताप उतरतो. अर्धा कप पाण्यात लसणाच्या दोन पाकळ्या घालून ते उकळावे आणि ते दिवसातून एकदा दयावे.

सर्दी-साठी-घरगुती-उपाय
https://www.freepik.com/free-photo/garlic-table_6449552.htm

५.सर्दी खोकल्यासाठी आले चांगले आहे. थोडेसे आले पाण्यात उकळवून घ्यावे. त्यात चमचाभर मध टाकावा. हे गरम असताना घ्यावे.

सर्दी-साठी-घरगुती-उपाय
Photo by Joris Neyt from Pexels

६. सर्दी आणि लहान मुलांना कोरडा खोकला असेल तर भेंडी गुणकारी आहे. भेंडीच्या चिकटपणामुळे सूज आणि वेदना कमी होतात. ५० ग्रॅम भेंडीचे तुकडे करून २५० मि . लि .पाण्यात उकळावे व त्याची वाफ घ्यावी. नाक व घसा मोकळा होतो. 

सर्दी-साठी-घरगुती-उपाय-कोणते-व-कारणे-आणि-लक्षणे-कोणती
Photo by Neha Deshmukh on Unsplash

७. सर्दीमधे घसा तडतड करीत असेल तर हळद चांगली आहे. ती जंतूघन्य आहे . पाव चमचा हळद १५ मिलिलिटर दुधात मिसळून ती प्यायला दयावी. गरम भांड्यात आधी हळद भाजावी, मग त्यावर दूध ओतावे. त्याची वाफ पण घ्यावी. घशातील व छातीतील कफ बाहेर पडतो.

सर्दीसाठी-घरगुती-उपाय-कोणते
Image by Steve Buissinne from Pixabay

८. नुसत्या पाण्याची वाफ घेतली तरी नाक मोकळे होते. दिवसातून तीन वेळा हि घ्यावी. गरम पाण्यात पाय बुडवून ठेवावेत. त्यामुळे कफाने भरलेली छाती मोकळी होते. गरम पाण्यात बुडवलेला टॉवेल पिळून गळ्याभोवती गुंडाळावा.

जाणून घ्या – सर्दी साठी घरगुती उपाय कोणते व सर्दी होण्याची कारणे आणि लक्षणे कोणती – माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

                   

Add Comment