जाणून घ्या तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम कोणते ? – Tobacco Side Effects in Marathi

 तंबाखू-सेवनाचे-दुष्परिणाम
Hand drawn vector created by freepik – www.freepik.com

जाणून घ्या तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम कोणते ? – माणूस आनंदाच्या शोधात असतो. समाधानाच्या शोधात तो विविध व्यसनांच्या आहारी जातो. तंबाखू हे त्यातलेच एक आहे. हा तंबाखूच अनेक माणसाचा बळी घेते. माणसाने त्याला सोडायचे म्हटले, तरी त्याची व्यसनी माणसावर इतकी घट्ट पकड असते की, माणूस आपल्या सवयीला सोडू शकत नाही. खूप आधीपासूनच तंबाखू आरोग्यास अपायकारक आहे हे सर्वांना माहित आहे. त्याचे दुष्परिणाम अतिशय गंभीर असले तरी दीर्घ काळानंतर होतात. धूम्रपान करणाऱ्याला त्याचे घातक परिणाम लवकर जाणवत नाहीत. हळूहळू हे घातक परिणाम वाढून जेव्हा उग्र, भयानक रूप धारण करतात. तेव्हाच व्यसनी माणसाला धूम्रपानाचे घातक परिणाम दिसतात.

तंबाखूचा वापर वेगवेगळ्या पध्दत्तीतून केला जातो. त्याचे सेवन सिगारेट, बिडी, सिगार, पाईप व हुक्क्याच्या रुपात केले जाते. तंबाखू हा ह्या कुठल्या का रुपात असो पण शरीराला घातकच ठरतो. तंबाखू आता गुटक्याच्या रुपात तसेच पानमसालाच्या रुपातही मिळते. पद्धत कुठलीही असली तरी तंबाखू आरोग्यास घातकच ठरते..सिगार किंवा पाईपद्वारे केलेले तंबाखुचे सेवन कमी मारक ठरते. ह्याचे कारण निकोटीन सरळ सरळ तोंडात जाते. धूम्रपान करणारा सिगार, पाईप ओढणारा फुफुसाचा खोलवर तंबाखूचा धूर पोहोचवू शकत नाही. त्यामुळे सिगार ओलढल्याने तंबाखूचा परिणाम होतो. सिगारेट ओढणारे निकोटीन संपूर्ण नाकातोंडात तसे फुफुसात खोलवर घालवून त्याचा आंनद लुटतात.

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम – Tobacco Side Effects

१. तंबाखूमुळे व धूम्रपान केल्यामुळे दमा, कॅन्सर सारखे भयानक रोग होतात. धूम्रपान करणाऱ्याला डोकेदुखी तर नेहमीचीच होऊन बसते. शिवाय कफ वाढतो. घशाचा कॅन्सरही होऊ शकतो. अर्धवट किंवा न जळालेल्या कार्बनच्या भागामुळे डाग पडतात. तसेच श्वसनाचा न्यूमोनिया रोगही होऊ शकतो तसेच धमनीचे रोगही होतात. धूम्रपानाचे डाग जर धूम्रपान करणे सोडून दिले तर हळूहळू जातात.

२. तंबाखूमध्ये जवळ जवळ ५०० प्रकारचे भाग आढळतात. त्यात मुख्य म्हणजे निकोटीन, डांबर, कार्बन मोनॉक्सइड, अमोनिया आणि अर्धवट न जळालेले कार्बनचे भाग आहेत. मुख्य म्हणजे हे सर्व भाग शरीरास अत्यंत घातकच आहेत. ते शरीरावर आरोग्यावर घातक परिणाम करतात. ह्यात सिगारेटच्या कागदाचाही समावेश करणे महत्वाचे आहे कारण तो कागदही शरीरास घातक आहे.

३. काही लोकांना धुम्रपानामुळे फुफुसाच्या गुंतावळ्याच्या विकार होऊ शकतो. हवा वाहून नेणाऱ्या श्वासवाहिन्या धुम्रपानामुळे अरुंद होतात व त्यामुळे हवेचा प्रवाह अडतो. हवेचा प्रवाह खंडित झाल्यामुळे प्राणवायूसाठी फुफुस गुदमरते. शरीराला प्राणवायू न मिळाल्यामुळे जीवाची धडपड सुरु होते श्वसनक्रियेत न सुधारणारे भयानक अडथळे निर्माण होतात. जर धूम्रपान बंद केले नाही तर मृत्यूपासून तुम्हांला कोणीच वाचवू शकणार नाही. धूम्रपान करणे सुरुच ठेवले तर शरीराची असमर्थता, निकृष्टता वाढत जाते व शेवटी न बरा होणारा फुफुसाचा कॅन्सर होऊन जातो.

४. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम – तंबाखूत असणाऱ्या डांबराच्या प्रमाणात कार्सिनोजेनिक ( Carcinogenic ) सापडते. त्यात ह्या कार्सिनोजेनिकचे प्रमाण जास्त असते. ते शरीराच्या अत्यंत महत्वाच्या कार्यपद्धतीवर आघात करते. त्याचा परिणाम कॅन्सर मध्ये होतो. वयात येताच सिगारेट ओढणे सुरु केल्यावर हळूहळू घातक परिणामांना सुरुवात होते. सर्वात धोकादायक म्हणजे दररोज ठरवून नेमक्या वेळी अनेक सिगारेट ओढणे. त्यामुळे फुफुसाचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त होतो.

५. तंबाखूमुळे हृदयविकार, पक्षघात सारखे विकारही होतात. निकोटीन रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरातील हृदय, मेंदू, पाय इत्यादी ठिकाणी रक्त पोहचविणाऱ्या प्रमुख व महत्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे रक्तप्रवाह थांबतो निकोटिनमुळे दमा, हृदयविकार, पक्षघात तसेच रक्तवाहिन्यांसंबंनधीत विकार होतात. निकोटीन हृदयाच्या ठोक्यांचे प्रमाण वाढवून हृदय प्रक्रिया असंतुलित करते. त्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयावर कामाचा ताण वाढतो. कामाचा ताण वाढल्यामुळे त्याला जादा ऑक्सिजनची आवशक्यता भासते.

६. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम – तंबाखूचे सेवन केल्यामुळे हृदय विकाराच्या झटक्यास प्रमुख कारण सिगारेट ओढणे होऊ शकते. सिगारेट ओढणे ह्या एकमेव कारणामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. ज्यांना इतर धोके असतात जसे की, बी वंशाचा हृदय विकाराचा झटका येण्याची परंपरा, रक्तदाबाचा त्रास, मधुमेह (Diabetes), तसेच रक्तातील कोलेस्ट्रालचे प्रमाण वाढणे. त्या लोकांना जास्तच धोका असतो. अशा वक्तींनी धूम्रपान करुच नये. पाईप किंवा सिगार ओढणाऱ्याना हृदयविकार होण्याचा धोका कमी प्रमाणात असतो. त्यांनी जोराने धूम्रपान करु नये. Also Read मधुमेहाची 11 लक्षणे व घरगुती उपाय मराठीत- MADHUMEH LAKSHNE GHARUGUTI UPAY IN MARATHI

७. सर्वसामान्य शारीरिक आरोग्य धूम्रपान केल्याने राहत नाही. कारण शरीरातील मुख्य भाग असलेल्या फुफुस व हृदयाच्या प्रक्रियांवरच तंबाखूने परिणाम केलेला असतो. कुठल्याही वयात असलात तरी धूम्रपानाने बौद्धिक प्रक्रियेला खीळ बसते. धूम्रपान करणाऱ्या हृदयावर शस्त्रक्रिया केल्यावर हृदयाची क्रिया सुरळीत चालू शकते. धूम्रपान करणाऱ्यांना पोटाचा अल्सर जवळजवळ सर्वांनाच होतो. त्यांना अन्न जात नाही. गेले तर उलटी होते. दात व हिरड्याचे विकारही जवळजवळ सर्वांनाच होतात. धुम्रपानामुळे डोळ्यांची द्रिष्टीही कमी होते. धूम्रपान बंद केल्यास त्यावर आळा बसू शकतो.

८. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम – तंबाखू चघळल्यामुळे तोंडाचा, घशाचा, मानेचा कॅन्सर होऊ शकतो. सिगारेट पद्धतीत सर्वात जास्त घातक आहे. ह्या इतर पद्धती त्यापेक्षा कमी घातक आहेत. कमी डांबराचा भाग असल्यामुळे सिगारेटमुळे फुफुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असली तरी त्यामुळे माणसाच्या मृत्यूस कारण ठरणारा हृदय विकाराचा झटका येण्याची व त्यासंबंनधीत विकार होण्याची शक्यता बळावते .

जाणून घ्या तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम कोणते ? – Tobacco Side Effects in Marathi माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

One Response

  1. Meenakshi Patil June 7, 2021

Add Comment