Vitamin B7 in Marathi – फायदे,कमतरता

Health-Benefits-of-Vitamin-B7-In-Marathi

शास्त्रीय नाव : बायोटिन
Scientific Name : Biotin

Vitamin B7 Benefits – B7 जीवनसत्वाचे फायदे

Vitamin B7 हे आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि आपल्या नखांसाठी खूप फायदेशीर आहे. हे जीवनसत्व आपले केस गळणे कमी करते व आपली ड्राय झालेली त्वचा चांगली करते.

बायोटिन हे जीवनसत्व आपल्या शरीरात अमिनो ऍसिड आणि फॅटी ऍसिड शोषून घेण्यास मदत करतात. कारण ते आपल्या शरीरातील ग्लुकोज तयार करतात.त्यामुळे आपले शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते.

B7 जीवनसत्व आपले शरीरातील स्नायू मजबूत करतात त्यामळे त्यांचा विकास होण्यास मदत होते व आपले स्नायू व मज्जासंस्था चांगल्या प्रकारे काम करतात.

B7 जीवनसत्व आपल्या शरीरातील कार्बोहैड्रेट, फॅट आणि प्रोटीन चा स्तर नियंत्रित ठेवतात. आपल्या शरीरातील शुगर ची मात्रा चांगली राहते कारण बायोटिन हे जीवनसत्व आपल्या शरीरातील इन्सुलिन नियंत्रित ठेवतं व लाल रक्त पेशी वाढवण्यास देखील मदत करतात.

Vitamin B7 Foods And Vegetables – फळे व भाज्या

अंडी , केळी , मशरुम , फ्लॉवर , ओटमील , मच्छी , दूध , दही, बदाम , शेंगदाणे

दही : एक कप दह्यात कमीत कमी ०. ०००२ मिलिग्रॅम बायोटिन असते कारण ह्यात ड जीवनसत्व खूप प्रमाणात असते. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस गळण्याचे प्रमाण खूप वाढते व शरीरात अशक्तपणा निर्माण होतो.

दूध : दूध हे कॅल्शियम चा खूप चांगला स्रोत आहे त्यामुळे आपली दात व हाडे स्वस्थ राहतात. दुधात कमीत कमी ०.०००३ मिलिग्रॅम बायोटिन असते.

पालक : पालक मध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट खूप कमी प्रमाणात असतात पालक मध्ये असणारे अँटिऑक्सिडेन्ट हे आपल्याला होणाऱ्या मधुमेह आणि कर्करोगापासून संरक्षण करतात .एक उकळलेल्या पालक मध्ये कमीत कमी ०.०००५ मिलिग्रॅम बायोटिन असते.

Vitamin B7 Deficiency – कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या

१.ऍनेमिया शरीरात रक्ताची कमी होणे.
२.भूक न लागणे.
३.उदासीनता लवकर थकवा लागणे .
४.शरीरातील स्नायू कमजोर होणे.
५.गॅस ची समस्या

शरीराला दररोज लागणारी आवशक्यता आरोग्यानुसार :

वयानुसार वयोगटकमीत कमी दरदिवशी
लागणारा डोस
जन्मापासून ६ महिन्याच्या बाळांना  ५ मिलिग्रॅम
७ ते १२ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना ६ मिलिग्रॅम
१ ते ३ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना ८ मिलिग्रॅम
४ ते ८ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना १२ मिलिग्रॅम
९ ते १३ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना  २० मिलिग्रॅम
१४ ते १८वर्षापर्यंतच्या लहान मुलांना २५ मिलिग्रॅम
१९ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना ३० मिलिग्रॅम
गरोदर स्रीयांना ३० मिलिग्रॅम
स्तनपान करणाऱ्या महिलांना ३५ मिलिग्रॅम

Related :

A Jivansatva Benefits in Marathi
C Jivansatva Benefits in Marathi

Vitamin B7 in Marathiमाहिती आवडल्यास नक्की ShareComments करा…!!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या ….घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या..!!

Add Comment