कलिंगड खाण्याचे फायदे-5 आणि दुष्परीणाम | Watermelon Benefits in Marathi

कलिंगड खाण्याचे फायदे आणि दुष्परीणाम

कलिंगड खाण्याचे फायदे आणि दुष्परीणाम काय आहेत ? हे आकाराने दिसायला मोठे आहे कलिंगड आतून लाल रंगाचा आणि बाहेरून दिसायला हिरव्या रंगाचा दिसतो. कलिंगड मध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याची मात्रा असते . कलिंगड हे चवीला गोड चव नसलेले व कडू ह्या तिन्ही  प्रकारात आढळतात.

कलिंगड ह्या फळाचा उगम कलहरी वाळवंटाच्या जवळपास झाल्याचा सांगितले जाते. कलिंगड ह्या फळाची शेती चीनमध्ये १०व्या शतकाच्यावेळी करण्यात आली तर चीन हा सध्या जगातील सर्वात  मोठा कलिंगड उत्पादक देश आहे. Watermelon खाण्याचे अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात घामासोबत आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते त्यावेळी कलिंगड ह्या फळाचे सेवन जर आपण केले तर आपणास आपल्या शरीरातील शुगर आणि पाणी याचे संतुलन ठेवण्यास  मदत होते. चला तर बघूया कलिंगड खाण्याचे फायदे

शास्त्रीय नाव: सिट्रयूललस लानाटस (Citrullus lanatus)

इंग्रजी नाव : Watermelon

कलिंगड खाण्याचे फायदे – Watermelon Health Benefits

1. किडनीस्टोन(Kidnystone):

Watermelon मध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे. पोटॅशियम चे प्रमाणही  भरपूर असल्यामुळे हे आपल्या किडनीला स्वस्थ ठेवण्यास मदत करते.आपल्या लघवी (युरिन ) मधला जो ऍसिड चा स्तर आहे त्यावर नियंत्रण राहते. व  आपला किडनीस्टोन बाहेर पडण्यास मदत होते . म्हणून कलिंगड फळाचे सेवन आपण आपल्या आहारात इतर फळांसोबत केले तर आपल्याला किडनीस्टोन होण्याचा धोका कमी होतो .

2.डोळ्यांसाठी फायदेशीर(Good Eyes): 

 कलिंगड खाण्याचे फायदे तसे भरपूर आहेत. कलिंगड हे डोळ्यांसाठी खूप लाभदायी आहे. कलिंगड हे व्हिटॅमिन ए चा खूप चांगला स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये बीटा  कॅरोटीन असल्यामुळे आपल्याला रातांधळेपणा आणि मोतीबिंदू या सारखे डोळ्यांचे आजार होण्यापासून दूर राहता येते . व्हिटॅमिन ए ला रेटिनॉल या शास्रीय नावाने सुद्धा ओळखले जाते . 

3.त्वचा व केसांसाठी फायदेशीर (Skin & Hair):

 कलिंगड चे  सेवन करणे आपल्याला फायदेशीर ठरु शकते. कलिंगड खाण्याचे फायदे त्यात असणारे व्हिटॅमिन्स आणि पोषकतत्वे आपल्या त्वचेला हायड्रेट आणि मॉईशराइज ठेवण्याच काम करतात. उन्हाळ्यात जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा आपली त्वचा डिहाइड्रेट होण्यास सुरवात होते.आपल्या शरीरातील पाण्याची क्षमता कमी होते.

4.उच्च रक्तदाब (High blood pressure):

 कलिंगड मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, अमिनो ऍसिड हि पोषकतत्वे असतात जी आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांना स्वस्थ ठेवण्याच काम करतात. आपल्या शरीरात ज्या रक्तवाहिन्या आणि धमन्या आहेत त्यांच्यावर तणाव निर्माण करुन आपला रक्तप्रवाह सुरळीत राहण्याचा काम हे  घटक करतात . एका अभ्यासाच्या रिसर्च  वरुन असे लक्षात आले  कि ज्या व्यक्तींचं वजन जास्त असत  त्यांना बहुतेक वेळा हाय बीपी (High blood pressure) चा  त्रास होतो त्यावेळी ह्या व्यक्तींनी रोज एक ग्लास कलिंगड चा जूस पिला तर रक्तदाबावर  नियंत्रण ठेवण्यास मदत होते. 

5.रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Power):

कलिंगड मध्ये व्हिटॅमिन सी आणि पाण्याची मात्रा भरपूर प्रमाणात असते . व्हिटॅमिन सी आपल्या शरीरारातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते . कलिंगड खाण्याचे फायदे त्यामुळे आपण  ताप आणि आपल्याला होणाऱ्या इतर इन्फेकशन पासून दूर राहू  शकतो.

 कलिंगड फळात असणारे आवश्यक घटकWatermelon Essential Ingredients

पोषकतत्वेव्हिटॅमिन्स
प्रोटीन : ०.६१ ग्रॅमव्हिटॅमिन ए : २४%,
फॅट : ०.१५ ग्रॅमव्हिटॅमिन सी : ११%
 कार्बोहैड्रेट्स : ७. ५५ ग्रॅम
 कॅलरीज : ३०. ० ग्रॅम
शुगर : ६. २ ग्रॅम
फायबर : ०. ४२ ग्रॅम

कलिंगड खाण्याचे दुष्परीणाम – Watermelon Side Effects

 ऍलर्जी

कलिंगड चे सेवन केल्याने काही लोकांना शरीरावर पुरळ किंवा चेहऱ्यावर सूज येणे अश्या  ऍलर्जी देखील होऊ शकतात. काही लोकांना काकडी ची किंवा गाजराची ऍलर्जी असते तर तर  त्यांना खूप सहजपणे कलिंगड ची एलर्जी होऊ शकते असे मानले जाते.   

पचनक्रिया  

 कलिंगड हे रात्री झोपायच्या वेळेस खाऊ नये कारण त्यात ऍसिड चे  प्रमाण असते  त्यामळे आपली पचनक्रिया बिघडू शकते.  

हृदय व रक्तवाहिन्या संबंधित विकार

कलिंगड मध्ये  पोटँशियमची मात्रा भरपूर असते. ज्या फळात किंवा अन्नात पोटॅशियम भरपूर असते अश्या पदार्थांचे सेवन जास्त किंवा प्रमाणाच्या बाहेर  केल्याने हृदय किंवा रक्तवाहिन्यासंबंधित समस्या उध्दभवू शकतात . तसेच काही आजार होऊ शकतात जसे कि  हृदयात अचानकपणे धडधड होणे . नस कमजोर होणे किंवा ह्याचा परिणाम आपल्या मज्जासंस्थेवर होऊ शकतो .

किडनीस्टोन 

जे लोक कलिंगड चे सेवन मोठ्या प्रमाणात करतात त्यांना स्नायू दुखणे किंवा किडनीस्टोन सारख्या समस्या होऊ शकतात.

कलिंगड कधी खावेWhen to eat watermelon

कलिंगड(watermelon) खाण्याची नियमित वेळ हि दुपारी १२ ते  १ किंवा २  च्या मध्ये खाणे  फायदेशीर आहे असं मानले जाते .

Related:

अननस फळाचे फायदे

खजूर खाण्याचे फायदे

कलिंगड खाण्याचे फायदे आणि दुष्परीणाम – मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा….!!!

आपल्या आरोग्याची काळजी घ्या …. घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!


Add Comment